आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशातील मथुरेतून अटक केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)च्या 4 कार्यकर्त्यांविरोधात बुधवारी मांट पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाली आहे. रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, अतीक उर रहमान, आलम, सिद्दीक आणि मसूदकडून अटकेदरम्यान 6 स्मार्टफोन, एक लॅपटॉप आणि 'जस्टिस फॉर हाथरस विक्टिम'नावाचे पंपलेट आढळले आहे. हे चौघे दंगली पेटवण्याच्या उद्देशाने हाथरसला जात होते. सुरुवातीच्या तपासात हेदेखील समोर आले आहे की, दंगली करणे आणि पळून जाण्याच्या टीप्स सांगणाऱ्या वेबसाईटशी या चौघांचा संबंध आहे.
या वेबसाइटला परदेशातून फंडिंग मिळते. यामुळेच आता या प्रकरणात ईडीची एंट्री झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, हाथरसच्या बहाण्याने जातीय दंगली घडवून आणण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला 100 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची फंडिंग मिळाली आहे. यात मॉरिशसमधून 50 कोटी रुपये आले आहेत.
पोलिस चारही आरोपींना रिमांडवर घेऊन चौकशी करेल
आता पोलिस चारही आरोपींना रिमांडवर घेऊन चौकशी करणार आहे. आतापर्यंत केलेल्या तपासात समोर आले आहे की, हे चौघे card.co नावाची वेबसाइट चालवत होते. या वेबसाइटच्या माध्यमातून फंड गोळा करण्याचे काम सुरू होते. या फंडद्वारे दंगल घडवूण आणण्याचा प्रयत्न होता. याशिवाय, या चौघांकडे सापडलेल्या पँपलेटमध्ये ' Am I not India's daughter, made with Carrd' अशा स्वरुपाचा मजकुर लिहीलेला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.