आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pfizer Coming In India । Covid 19 Vaccine For Adults & Kids । AIIMS Director Randeep Guleria । 3rd Wave Of Coronavirus

मुलांचे लसीकरण:कोव्हॅक्सिनचे ट्रायल्स सुरू, AIIMS चे संचालक म्हणाले- फायजरची लस मुलांना देता येईल

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांवर स्वदेशी लसीचे ट्रायल्स सुरू

सध्या देशात 2-18 वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीचे ट्रायल सुरू आहेत. दरम्यान, मुलांसाठी अजून एक लस लवकरच मिळण्याची आशा आहे. अमेरिकन कंपनी फायजरची कोरोना लसही मुलांना देता येईल, अशी माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे.

गुलेरिया CNN-न्यूज 18 ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले की, भारत सरकार लवकरच अमेरिकन कंपनी फायजरच्या कोरोना लसीला परवानगी देऊ शकते. एखाद्या लसीला ट्रायल्सशिवाय परवानगी देण्याची पहिलीच वेळ नाही. केंद्राने यापूर्वीही अमेरिका, ब्रिटेन, यूरोप आणि डब्ल्यूएचओकडून आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळालेल्या व्हॅक्सीनला परवानगी दिलेली आहे. त्यामुळेच भारतात लवकरच अजून एक लस मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत.

आधी फायजरचा डेटा नव्हता, आता आहे- गुलेरिया
गुलेरिया पुढे म्हणाले की, आपल्याकडे आधी डेटा नव्हता, म्हणून फायजर आणि मॉडर्नासारख्या व्हॅक्सीनला भारतात यायला उशीर झाला. पण, आता आपल्याकडे पूर्ण डेटा आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारावर भारतात या लसीला वापरासाठी परवानगी मिळाली आहे.

मुलांवर स्वदेशी लसीचे ट्रायल्स सुरू
2-18 वयोगटातील मुलांवर भारत बायोटेकच्या कोव्हॅनचे ट्रायल सुरू आहे. 525 आरोग्य वॉलंटियर्सवर या लसीचे ट्रायल सुरू आहेत. त्यांनी लसीचे दोन डोस दिले जातील. पहिला डोस दिल्याच्या 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल.

बातम्या आणखी आहेत...