आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लस:फायझरने लसीच्या आपत्कालीन वापराची भारतातही मागितली परवानगी

नवी दिल्ली / पवन कुमारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फायझरच्या लसीचा ब्रिटन व बहरीनमध्ये आणीबाणीत वापर

ब्रिटन व बहरीनमध्ये कोरोना लसीकरणाची परवानगी मिळाल्यानंतर फायझरने भारतातही आणीबाणीच्या स्थितीत वापराची परवानगी मागितली आहे. कंपनीकडून भारतीय नियामक संस्थेला तशी विनंती करण्यात आली आहे. भारतात तिचा वापर करण्यापूर्वीच्या क्लिनिकल ट्रायलमधून सूट देण्यात यावी. त्यामुळे विनाविलंब भारतात लसीकरण केले जाऊ शकेल. कंपनीने अमेरिकेत आणीबाणीच्या स्थितीत वापरासाठी २० नाेव्हेंबरला अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु आतापर्यंत त्याबाबतचा निर्णय झालेला नाही. चार डिसेंबरच्या रात्री अमेरिकी कंपनी फायझरकडून सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनला (सीडीएससीआे) भारतात लसीच्या वापरासाठी परवानगी मागितली आहे. सीडीएससीआेकडून मिळालेल्या माहितीनुसार आता कंपनीचा अर्ज व सादर करण्यात आलेल्या पत्रांचे मूल्यमापन केले जाईल. त्यानंतर विषयतज्ज्ञांची समिती त्यांच्या दाव्याची पडताळणी करेल. त्यानंतर समितीच्या सल्ल्यानुसार नियामक डीसीजीआय फायझरला आणीबाणीच्या स्थितीत परवानगी द्यायची की नाही, हे ठरवेल.

२१ दिवसांच्या अंतराने डोस
फायझरच्या लसीचे दोन डोस द्यावे लागतील. सीडीएससीआेला दिलेल्या अर्जात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. पहिल्या डोसच्या २१ दिवसांनी दुसरा डोस द्यावा लागेल. दोन्ही डोस प्रत्येकी ३० मिली असतील. अमेरिकेत ३६ हजार लोकांवर या लसीचे परीक्षण झाले आहे, असा दावा कंपनीने केला आहे. लसीला उणे ९० ते उणे ६० अंशांपर्यंतच्या वातावरणात साठवले जाऊ शकते. ते सहा महिन्यांपर्यंत वापरता येऊ शकते. १९५ वाइल्सचे एक पाकीट असेल.

अमेरिका : दिवसात २.३५ लाख रुग्णांचा आकडा
थँक्स गिव्हिंग डे साजरा करण्यासाठी केलेला सैरसपाटा अमेरिकींना महागात पडला आहे. कोरोनाबाधितांच्या प्रकरणात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठा संसर्ग झाला. शुक्रवारी २ लाख ३५ हजार २७२ नवे रुग्ण आढळून आले. एका दिवसातील हा विक्रमी आकडा ठरला. सोबतच २ हजार ७१८ लोकांचा मृत्यू झाला..

युरोप : रशिया, इटली, जर्मनीत २० हजार रुग्ण
युरोपात कोरोना महामारीमुळे मोठा फटका बसला. रशियात शुक्रवारी २७ हजार ४०३ नवे रुग्ण आढळून आले. इटलीत २४ हजार ९९ व जर्मनीत २३ हजार ५४१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांत नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. शुक्रवारी फ्रान्समध्ये ११ हजार २२१ नवे रुग्ण आढळून आले. ब्रिटनमध्ये १६ हजार २९८ नवे रुग्ण समोर आले.

भारत : सक्रिय रुग्ण ४.१ लाखांहून कमी
गेल्या आठ दिवसांपासून भारतात नव्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे शनिवारी देशात सक्रिय रुग्णांची संख्या ४.१० लाखांहून कमी झाली. ४ लाख ९ हजार ६८९ रुग्ण आहेत. गेल्या १३६ दिवसांत सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली. २२ जुलैला सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ११ हजार १३३ होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser