आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सर्व चाचण्या पूर्ण करून ब्रिटनमध्ये कोरोनाचे लसीकरण सुरू केलेली फायझर ही जगातील पहिली लस उत्पादन कंपनी आता भारतात संधीच्या शोधात आहे. कंपनीने आपत्कालीन मंजुरीसाठी भारतीय नियामकांकडे अर्ज दिलेला आहे. पण त्यासाठी उणे ७० अंश तापमानाची गरज असते आणि भारताच्या कोल्ड स्टोअरेज सुविधांत एवढे कमी तापमान नसते. या समस्येवर मात करण्यासाठी कंपनी आता भारतीय परिस्थितीस अनुरूप ठरेल अशी नवी लस तयार करत आहे. फायझरचे सीईओ अल्बर्ट बोरला यांनी सांगितले,‘आम्ही एका नव्या फाॅर्म्युलेशनवर काम करत आहोत, त्यात उणे ७० अंश सेल्सियसवर लस स्टोअर करण्याची गरज नसेल. ती सामान्य रेफ्रिजरेशनमध्ये ठेवता येऊ शकेल.’ लसीचे स्टोअरेज, तापमानाची निगराणी आणि लसीच्या वाहतुकीसाठी एक विस्तृत लॉजिस्टिक प्लॅन तयार केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
सीरम आणि भारत बायोटेकला आणखी डेटा द्यावा लागणार
फायझर, सीरम इंडिया आणि भारत बायोटेकच्या लसीच्या आपत्कालीन मंजुरीशी संबंधित अर्जावर केंद्रीय औषधी सीडीएससीओ तज्ञ समितीच्या बैठकीत बुधवारी लसीशी संबंधित डेटा व इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. समितीने सीरम व भारत बायोटेकला आणखी डेटा देण्यास सांगितले आहे. सूत्रांनुसार, सीरमच्या सहकार्याने आॅक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका तयार करत असलेल्या कोविशील्ड या लसीला ब्रिटनमध्ये मंजुरीची प्रतीक्षा करावी आणि त्यानंतरच पुढे जावे, असे मत समितीत व्यक्त करण्यात आले. मंजुरी द्यायची की नाही याबाबतची शिफारस समिती डीसीजीआयला करेल. दरम्यान, आपत्कालीन उपयोगाचे दोन्ही अर्ज समितीने फेटाळले नाहीत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.