आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pfizer Moderna Latest News Update | Corona Vaccine Tracker, Corona Vaccine, Covishield, Covaxin

मॉडर्ना आणि फायजरसाठी ग्रीन कॉरिडोर:मोठे देश आणि WHO कडून अप्रूव्हल असेल तर कंपन्यांच्या अटी मान्य करायला तयार-केंद्र सरकार

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात सध्या 3 व्हॅक्सीन आणि एक पाउडर उपलब्ध

मॉडर्ना आणि फायजरच्या कोरोना व्हॅक्सीन देशात उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार कंपनीच्या अटी मान्य करण्यास तयार झाले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने म्हटले की, या लसींना जगातील मोठे देश आणि जागतिक आरोग्य संघटने (WHO) कडून आपातकालीन मंजुरी मिळाली असेल, तर भारतात वापरासाठी परवानगी दिली जाईल.

नुकसान आणि जबाबदारीवर लवकरच निर्णय

मॉडर्ना आणि फायजर त्या कंपन्यांमध्ये सामील आहे, ज्यांनी नुकसान भरपाई आणि आपातकालीन वापराची परवानगी दिल्यानंतर होणाऱ्या स्थानिक चाचण्यांची सक्ती दूर करण्याची अपील भारत सरकारला केली होती. सरकारने अद्याप लसीच्या वापरानंतर होणाऱ्या गंभीर साइड इफेक्टनंतर नुकसान भरपाई आणि जबाबदारीबद्दल निर्णय घेतलेला नाही. या अटीवर लवकरच निर्णय होऊ शकतो.

लसीची सद्यस्थिती लक्षात घेता निर्णय

DGCI चे चीफ वीजी सोमानी म्हणाले की, WHO सारख्या आरोग्य संघटना आणि मोठ्या देशांमध्ये परवानगी मिळाल्यानंतर भारतात या व्हॅक्सीनची क्वालिटी आणि स्टेबिलिटीच्या चाचण्या केल्या जाणार नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत देशाला जास्त लसींची गरज आहे. यामुळेच निर्णय घेण्यात आला आहे.

NEGVAC ने केली होती शिफारस

नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीनेशन एडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 म्हणजेच NEGVAC ने म्हटले होते की, 'अमेरिका, ब्रिटंन, जापान, यूरोप आणि WHO ने ज्या लसींना आपातकालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे, त्या लसी आधीच कोट्यावधी लोकांना देण्यात आल्या आहेत. आता भारतात परवानगी मिळाल्यानंतर लसींचे ट्रायल्स आणि प्रत्येक बॅचची सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीमध्ये चाचणी गरजेची नाही. परंतु, ज्या देशाकडून लस येत आहे, तेथील संस्थांनी याला सर्टिफाइड करणे गरजेचे आहे.'

भारतात सध्या 3 व्हॅक्सीन आणि एक पाउडर
सीरम सीरम इंस्टीट्यूटच्या कोवीशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा सध्या भारतात वापर होत आहे. शिवाय, रशियाच्या स्पुतनिक-वी वापरासाठी परवानगी मिळाली आहे. तर, DRDO ने तयार केलेल्या 2-DG औषधालाही मंजुरी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...