आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिसीत अडकली व्हॅक्सिन खरेदी:फायझर आणि मॉडर्ना केंद्र सरकारच्या संपर्कात, फायझरने सांगितले- थेट राज्यांना कोरोना व्हॅक्सिन देणार नाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना व्हॅक्सिनच्या कमतरतेत आता परदेशातून होणारा व्हॅक्सिन पुरवठा नियमात अडकला आहे. अमेरिकन कंपनी फायझर म्हटले आहे की, ते केवळ केंद्र सरकारला व्हॅक्सिन सप्लाय करेल. दुसरीकडे, केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, फायझरसोबत मॉडर्नाही आमच्या संपर्कात आहेत. अनेक राज्य सरकारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी लस मिळवण्यासाठी फायझर आणि मॉडर्ना यांच्याकडे संपर्क साधला होता, परंतु केवळ केंद्र सरकारशीच व्यवहार करू असे उत्तर त्यांना मिळाले.

यावर आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले की, फायझर असो वा मॉडर्ना, आम्ही सर्वांशी केंद्रस्तरावर दोन मार्गांनी समन्वय साधत आहोत. एक नियामक आहे, जे अप्रूवलच्या संदर्भात आहे आणि दुसरे खरेदी संबंधित आहे. ते म्हणाले की फायझर आणि मॉडर्ना या दोघांच्या ऑर्डर आधीच फुल आहेत. ते भारताला किती डोस देऊ शकतात हे त्यांच्या अतिरिक्ततेवर अवलंबून आहे. ते भारत सरकारला सांगतील. त्यानंतर आम्ही राज्य सरकारांना पुरवठा करू किंवा समन्वय साधू.

दिल्ली आणि पंजाब सरकारला लस देण्यास दिला नकार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सांगितले की, फायझर आणि मॉडर्ना यांनी दिल्ली सरकारला कोरोनाव्हायरस लस विकायला नकार दिला आहे. त्यांना केंद्राशी थेट व्यवहार करायचा आहे. केजरीवाल म्हणाले की, मी केंद्र सरकारला आवाहन करतो की, या कंपन्यांशी चर्चा करावी आणि व्हॅक्सिन आयात करून राज्यांपर्यंत पोहोचवाव्यात.

यापूर्वी पंजाब सरकारच्या एका वरिष्ठ अधिका्यानेही असा दावा केला होता. ते म्हणाले की, मॉडर्नाने थेट राज्य सरकारला हे सांगून व्हॅक्सिन पाठवण्यास नकार दिला होता की, पॉलिसीनुसार कंपनी केवळ केंद्र सरकारसोबत व्यहवार करेल.

बातम्या आणखी आहेत...