आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pfizer's Condition Accepted By The Government, 5 Crore Doses Can Be Obtained In Four Months

लसीसाठी आटापिटा:फायझरची अट सरकारला मान्य, चार महिन्यांत मिळू शकतात 5 कोटी डोस

पवनकुमार | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सनच्या नकारानंतरही विदेशी लसींबाबत आशा कायम

मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांनी भले यंदा लसी देण्यात असमर्थता दर्शवली असली तरी फायझरकडून भारताला लस मिळण्याची आशा अद्याप जिवंत आहे. भारताला लस देण्यापूर्वी फायझरला नियमांत काही प्रमाणात सूट हवी आहे. मात्र केंद्र सरकार यासाठी तयार नव्हते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फायझरची अट मान्य करण्यास आता केंद्र सरकार तयार आहे.परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. ते तेथे फायझरच्या संपर्कात आहेत. कोणत्याही क्षणी फायझर आणि भारत सरकार यांच्यात लसीबाबतच्या व्यवहाराची घोषणा होऊ शकते अशी चर्चा आहे.

लसीनंतरच्या दुष्परिणामांबाबत कंपनीवर कायदेशीर कारवाई व्हायला नको, असे फायझरचे मत आहे. जगभरातील १५ कोटी लोकांनी फायझरची लस घेतली आहे. मात्र त्याबाबत कोठूनच गंभीर दुष्परिणामांची माहिती नाही. इंग्लंडसह ११६ देशांनी फायझरला नियमांत सूट दिली आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकारही सूट देण्यास तयार आहे. हा व्यवहार झाल्यास फायझर आगामी ४ महिन्यांत एकूण ५ कोटी डोस भारताला देण्याच्या तयारीत आहे. प्रत्येकी एक कोटी डोस जुलै-ऑगस्टमध्ये, २ कोटी डोस सप्टेंबरमध्ये तर एक कोटी डोस ऑक्टोबरमध्ये भारतात येऊ शकतात.

माॅडर्नाचे ५ कोटी डोस भारतात येतील, मात्र २०२२ मध्येभारतात २०२२ पर्यंत लस अाणण्याच्या तयारीत सध्या माॅडर्ना अाहे. २०२२ मध्ये माॅडर्नाकडून ५ कोटी डोस खरेदीबाबत सिप्ला या भारतीय औषधी कंपनीने करार केला अाहे. यासाठी माॅडर्ना लवकरच भारत सरकारकडे अर्ज करणार अाहे.

बायाेलाॅजिकल ईने मागितली अार्थिक मदत
बायाेलाॅजिकल ई या भारतीय कंपनीने म्हटले की, कोरोना प्रतिबंधक लसीसाठीचा कच्चा माल अायात करावा लागतो, तो अाता महागला अाहे. त्यासाठी कंपनीला अार्थिक मदत हवी अाहे. डिसेंबर २०२१ पर्यंत ३० कोटी डोस बनवण्याची क्षमता असल्याचा दावा कंपनीने केला अाहे.

जाॅन्सन अँड जॉन्सनच्या लसीचे १०० कोटी डोस भारतात बनणार, सर्व परदेशामध्ये जाणार, यापैकी काही डोस भारताला मिळावे : केंद्र सरकार
केंद्रीय कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत देशातील कोराेना प्रतिबंधक लसीच्या ताज्या स्थितीबाबत माहिती देण्यात अाली. त्यानुसार, माॅडर्ना अाणि जाॅन्सन अँड जाॅन्सनच्या लसी यंदा मिळण्याची शक्यता अत्यंत कमी अाहे. त्यातच जाॅन्सन अँड जाॅन्सनचे पुढील वर्षापर्यंत तयार होणारे सर्व डोस जगभरातील इतर देशांनी आधीच बुक करून ठेवलेले अाहेत. जाॅन्सन अँड जाॅन्सनचे १०० कोटी डोस भारतातच तयार होतील. मात्र हे सर्व डोस परदेशात जाणार आहेत. यातील काही डोस भारताला मिळावेत यासाठी परराष्ट्र मंत्रालय तसेच जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रयत्न सुरू अाहेत. देशातील कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन वाढवण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...