आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Photos Capture India's Independence Day Celebration At All Over India Red Fort To Lal Chowk

PHOTOS मध्ये स्वातंत्र्याचा उत्सव:श्रीनगरच्या लाल चौकात घुमला “वंदे मातरम्” चा नारा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरात स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर देशातील इतर ठिकाणीही ध्वजारोहण करण्यात आले. काश्मीरमधील लाल चौकात ध्वजारोहण केल्यानंतर तरुणांनी वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणाही दिल्या.

भारतासोबतच अमेरिकेतील बोस्टनमध्येही तिरंगा ध्वज फडकवण्यात आला आहे. त्याचवेळी आयएनएस तरंगिणीने युरोपच्या समुद्रात तिरंगा ध्वज फडकवला.

पाहा देशातील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची खास छायाचित्रे...

पंजाब | अटारी-वाघा सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी आणि नातू पृथ्वी अंबानीसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने यांनी तिरंगा फडकवत स्वातंत्र्यदिन साजरा केला.

अरुणाचल प्रदेश | तवांगमधील विविध उंचीवर राष्ट्रध्वजासह भारतीय सैनिक

लडाखमधील पँगॉन्ग त्सो तलावाजवळ आयटीबीपीच्या जवानांनी तिरंगा फडकावला. हे एक लांब अरुंद, खोल, एंडॉर्फिक (लँडलॉक्ड) सरोवर आहे. जे हिमालयात 14,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर आहे.

शाहरुखच्या 'मन्नत'वर डौलाने फडकला तिरंगा. यावेळी ध्वज फडकवताना शाहरुख खान सोबतच पत्नी गौरी खान आणि मुले आर्यन खान आणि अबराम खान हे देखील उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी फडकवला तिरंगा

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिरंगा फडकवल्यानंतर आदिवासी महिलांसोबत लोकनृत्य सादर केले.

स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमधील लाल चौकातील घंटाघरावर तिरंगा फडकवण्यात आला आहे. मात्र, यंदा प्रजासत्ताक दिनी तेथे ध्वजारोहण करण्यात आले. हे घंटा घर 1980 मध्ये बांधण्यात आले होते.

देशातील सर्वोच्च युद्धभूमी असलेल्या सियाचीनवर भारतीय लष्कराच्या जवानांनी तिरंगा फडकवला. सियाचीनची उंची सुमारे 5,400 मीटर आहे.

भारतीय नौदलाच्या जवानांनी अंदमान निकोबार बेटांजवळील समुद्रात पाण्याखाली तिरंगा फडकवला. 30 डिसेंबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता.

लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी NCC कॅडेट्सची भेट घेतली. यावेळी त्यांनी तरुणांशी संवादही साधला.

बोस्टनमध्ये आकाशात अमेरिकेच्या ध्वजासह तिरंगाही दिसला. दोन्ही ध्वज जमिनीपासून 200 मीटर उंचीवर फडकवण्यात आले.

आयएनएस तरंगिणीवर भारतीय नौदलाच्या जवानांनी युरोपीय भूभागाच्या समुद्रात तिरंगा फडकवला. INS तरंगिणी हे भारतीय नौदलाचे पहिले सेल प्रशिक्षण जहाज आहे. हे 1997 मध्ये नौदलात समाविष्ट केले गेले.

बातम्या आणखी आहेत...