आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
2020 च्या सुरुवातीस कोरोना जगभरात पाय पसरत होता. मात्र भारतात राजकारण सुरू होते. शाहीन बागेसह देशाच्या बर्याच भागांत नागरिकता दुरुस्ती कायदा (सीएए) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) च्या विरोधात प्रचंड निदर्शने झाली. दरम्यान, मुखवटा घातलेल्यांनी जेएनयू कॅम्पसवर हल्ला केला. दुसरीकडे केजरीवाल सरकार दिल्लीत परतले. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर दिल्लीत पोहोचताच दंगल उसळली.
राजकारण इथेच थांबले नाही. मध्य प्रदेशमधील कॉंग्रेसचे कमलनाथ सरकार 15 महिन्यांनंतर पडले. कॉंग्रेसच्या ज्योतिरादित्य सिंधियाच्या मदतीने राज्यात पुन्हा एकदा शिवराज सिंहांचे कमल उमलले. दुसरीकडे, कोरोनाचा धोका इतका वाढला की, मार्चपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी एक दिवसाचा सार्वजनिक कर्फ्यू लावला आणि 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत आपल्या देशाची स्थिती फोटोंमधून पाहूया…
जानेवारी : JNU कँपसमध्ये हल्ला झाला, शाहीन बागमध्ये CAA-NRC च्या विरोधा प्रदर्शन सुरू राहिले
JNU कँपसमध्ये हल्ला
जेएनयूमध्ये 5 जानेवारीला 50 मुखवटा घातलेल्यांनी हल्ला केला. जवळपास 40 विद्यार्थ्यी-शिक्षक जखमी झाले. हल्ल्यासाठी एबीव्हीपीवर आरोप लावण्यात आले. अनेक स्टिंग समोर आले. देशाच्या अनेक कँपसमध्ये विरोध प्रदर्शन झाले.
शाहीन बागचा प्रजासत्ताक दिन
दिल्लीच्या शाहीन बागमध्ये नागरिकता संशोधन अधिनियमन (CAA) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (NRC) च्या विरोधात आंदोलन झाले. हजारो आंदोलकांनी 26 जानेवारीला तिरंगा फडकावला. या आंदोलनाचे नेतृत्त्व महिला करत होत्या.
शाहीनबाग दादी
बिलकिस दादी CAA-NRC च्या विरोधात देशभरात विरोधाचा चेहरा बनल्या. सप्टेंबरमध्ये टाइम मॅगझीनने 82 वर्षांच्या आजीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गूगल सीईओ सुंदर पिचाईंसह जगातील 100 सर्वात प्रभावी लोकांमध्ये सामिल केले.
फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले, सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) यावर दिल्लीत दंगल
केजरीवाल रिटर्न्स
दिल्लीच्या रामलीला मैदानात अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सर्वात जास्त चर्चा झाली 'बेबी केजरी' आणि 'ज्यूनियर केजरी' च्या नावाने प्रसिद्ध झालेल्या अव्यानची. त्याला शपथग्रहण सोहळ्यातही बोलावण्यात आले होते.
नमस्ते ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कुटुंबासह तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये लाखो लोकांच्या उपस्थितीत नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम झाला. ट्रम्प यांनी दावा केला होता की, 60 लाख ते एक कोटी लोक इव्हेंटमध्ये सामिल होतील.
दिल्लीत दंगली
CAA चे विरोधी आणि समर्थकांमध्ये झडप झाली. यामुळे 24 फेब्रुारीला उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये सांप्रदायिक हिंसा भडकली. या दंगलीमध्ये 53 लोकांचा मृत्यू झाला आणि 200 पेक्षा जास्त लोक जखमी झाले.
मार्च : सिंधिया भाजपमध्ये आले, कमलनाथ यांनी सीएम पदाचा राजीनामा दिला, पहिले लॉकडाऊन लागले
MP सरकारमध्ये बदल
काँग्रेसवर नाराज असलेले ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये आले. यासोबत त्यांच्या समर्थक आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. कलमनाथ यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला जवळपास 15 महिन्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्त्वात पुन्हा भाजप सरकार आले.
जनता कर्फ्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर 22 मार्चला देशभरात कोरोना विरोधात बचाव करण्यासाठी जनता कर्फ्यू लागला. संध्याकाळी देशभरातील लोकांनी कोरोना योद्धांना सलाम केले. सामान्य जनतेपासून राजकारणी आणि चित्रपटसृष्टीसंबंधीत लोकांनीही घंटा, शंख आणि ताट वाजवून कोरोना वॉरियर्स यांचे आभार मानले.
21 दिवसांचे लॉकडाऊन
कोरोनामुळे जनता कर्फ्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले. हा फोटो गाजियाबादच्या बस स्टेशनचा आहे. येथे शेकडो प्रवासी मजूर आपल्या गावी जाण्यासाठी एकत्र आले. असेच फोटो देशभरातील अनेक शहरांमधून समोर आले.
एप्रील : देशभरात लॉकडाऊन सुरू होते, पंतप्रधानांच्या आवाहनावर लोकांना कोरोना वॉरियर्ससाठी दिवे पेटवले
रात्री 9 वाजता 9 मिनिटे
कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांसाठी 5 एप्रिलला एक खास आवाहान केले. कोरोना वॉरियर्सला सलाम करण्यासाठी पंतप्रधानांच्या आवाहनावर देशाने रात्री 9 वाजता नऊ मिनिटे दिवे पेटवले. स्वतः पंतप्रधानांनीही दिवा पेटवला.
घर वापसीचा पहिला आवाज
लॉकडाऊनदरम्यान सर्वात पहिले गुजरातमध्ये प्रवासी मजुरांनी घरवापसीची मागणी केली होती. सूरतमध्ये शेकडो प्रवासी मजूर घरी जाण्यासाछी जमा झाले होते. मजुरांनी म्हटले होते की, त्यांच्याजवळ खाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे त्यांना लॉकडाऊन असूनही गावाकडे पाठवण्यात यावे.
मे महिना
सायकलवर 1200km चा प्रवास
लॉकडाऊनदरमयान एका 15 वर्षांची मुलगी ज्योती कुमारीने सायकलवर वडिलांना बसवून गुरुग्रामपासून बिहारपर्यंत प्रवास केला. वडिलांना मागे बसवून जवळपास एक आठवडा 1200km सायकल चालवून मुलगी बिहारच्या दरभंगा येथे पोहोचली.
लॉकडाऊनची मदर इंडिया
लॉकडाऊनदरम्यान हा फोटो चर्चेत राहिला. एक मुलगा पायी चालून थकल्यावर सूटकेसवर झोपला. त्याची आई सुटकेस ओढत रस्त्यावरुन जात होती. पंजाबमधून निघत हे मजूर आग्रामधून पायी झासी येथे परतत होते.
खरा हिरो
लॉकडाऊनमध्ये देशभरात लाखो प्रवासी मजूर फसले. या प्रवाशांच्या मदतीसाठी बॉलिवूड अॅक्टर सोनू सूद समोर आला. त्याने हजारो मजुरांना स्वतःच्या खर्चाने बस आणि विमानांनी त्यांच्या घरी पोहोचवले.
कोरोना वॉरियर्सवर फूलांचा वर्षाव
कोरोनापासून जीव वाचवण्यासाठी रात्र-दिवस काम करत असलेल्या हेल्थ वर्कर्सवर आकाशातून फुलांचा वर्षाव करण्यात आला. रुग्णालयांवर वायुसेनेच्या विमानांनी तीन चक्कर मारत फुलं उधळली. हा फोटो मुंबईच्या अश्विनी हॉस्पिटलचा आहे.
अजून एक गॅस कांड
विशाखापट्टनममध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीच्या केमिकल प्लांटमध्ये विषारी वायू लीक झाल्याने एका मुलासह 11 लोकांचा मृत्यू झाला. 200 लोकांना डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास अडचण असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोटासाठी
लॉकडाऊनमध्ये जालन्यामधून पायी मध्यप्रदेशात जात असणाऱ्या 16 मजुरांना मालगाडीने चिरडले. जवळपास 40 किमी पायी चालल्यानंतर हे प्रवासी मजूर थकून पटरीवर झोपले. या दरम्यान प्रवासी मजूर अपघातात मरण पावले.
'आ अब लौट चले '
लॉकडाऊनमुळे सर्व विदेशी उड्डाणांवर बंदी होती. यामुळे अनेक लोक विदेशातच अडकले होते. सरकारने 15 हजार लोकांसाठी देशात परतण्याची व्यवस्था वंदे भारत मिशनने केली.
जून : तीन नवीन कृषी कायद्यांना मिळाली राष्ट्रपतींची मंजूरी
तीन कृषी कायदे
शेतीसंबंधीत तीन कृषी कायदे राष्ट्रपतींनी मंजूर केले. या माध्यमातून काँन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि सरकारी मंडीच्या बाहेर खासगी मंड्यांच्या मार्ग मोकळा झाला. युद्ध आपत्ती आणि खूप महागाई सारख्या खास परिस्थिती वगळता आवश्यक कायद्यातून कृषी उत्पादनाला काढून टाकण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.