आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाचा परिणाम २०२१ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर असणार आहे. महामारीमुळे मेळ्यात फिजिकल डिस्टन्सिंग राखत लोकांचे स्नान होईल. तपासणीसाठी परिसरात ३ मोठी कोविड केंद्रेही बनवली जातील.
प्रथमच सामान्य घाटांसह नैसर्गिक घाटांचाही उपयोग केला जाईल. तात्पुरत्या स्वरूपातील प्लास्टिकच्या या घाटांवर सुरक्षेसाठी डीप वॉटर बॅरिकेडिंग असेल. प्रत्येक बॅरिकेडिंग चार मीटर परिसरात असेल. भाविकांना सुरक्षितपणे अंघोळ करता यावी म्हणून यात चार फूट पाणी राहील. मेळावा परिसर एकमेकांशी जोडण्यासाठी या वेळी ३ ठिकाणी केवळ ५ तात्पुरते लिंक पूल केले जातील. गेल्या कुंभमेळ्यात १८ ठिकाणी ३२ पूल बनवण्यात आले होते. हे पूल मेळावा परिसरात मुख्य पार्किंगना मुख्य ठिकाणांना जोडण्यासाठी बनवले जातात.
आता २ मोटार पूल बैरागी कॅम्पपासून गौरीशंकरला जोडण्यासाठी असतील व दोन पूल नीलधारा ते चंडीघाटसाठी असतील. चंडीदेवी रोपवेजवळून गौरीशंकरला जोडण्यासाठी पादचारी पूल बनवला जाईल. जानेवारीपर्यंत सर्व पूल तयार होतील. तसेच मेळ्यात तीन मोठी कोविड केअर सेंटर्सही असतील. नीलधारा आणि बैरागी कॅम्पमध्ये मेळा भरेल. मेळा परिसरात रस्ते, पाणी, विजेची कामे सुरू झाली आहेत.
शाही स्नान
पहिले : ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्री
दुसरे : १२ एप्रिलला सोमवती अमावास्या
तिसरे : १४ एप्रिलला संक्रांती व वैशाखी
चौथे : २७ एप्रिलला चैत्र पौर्णिमा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.