आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:बीई, बीटेक प्रवेशासाठी 12वीत आता फिजिक्स, मॅथ्स आवश्यक नाही, शैक्षणिक सत्र 2021-22 पासून होणार लागू

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापैकी कुठलेही तीन विषय घेतले तरी चार वर्षांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम, बीटेकही करू शकाल

कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग आणि तांत्रिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी आता १२ वीत फिजिक्स, मॅथ्स घेणे आवश्यक असणार नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सव्यतिरिक्तही अनेक विषय यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यापैकी कुठलेही तीन विषय घेऊन विद्यार्थी १२ वीत उत्तीर्ण झाला असेल तर त्याला बीई, बीटेकमध्ये प्रवेश मिळेल. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) शुक्रवारी इंजिनिअरिंग आणि तांत्रिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नवे नियम जारी केले आहेत. बदललेले नियम २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून लागू होतील.

एआयसीटीईनुसार या बदलामुळे बीई (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग), बीटेक (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी) यांसारख्या अभ्यासक्रमांचे दरवाजे वैद्यकीय, वाणिज्य आणि व्यावसायिक शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठीही खुले होतील. ज्या विद्यार्थ्यांनी तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे तेही बीई, बीटेक पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतील. या बदलांतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे मॅथ्स, फिजिक्स, इंजिनिअरिंगचे बॅकग्राउंड नाही त्यांच्यासाठी ‘उपयुक्त ब्रिज कोर्स’ही प्रस्तावित केला जाईल. संबंधित विद्यापीठ तो उपलब्ध करून देईल.

यापैकी कुठलेही तीन विषय घेतले तरी चार वर्षांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम, बीटेकही करू शकाल
फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोलॉजी, इन्फर्मेटिक्स प्रॅक्टिसेस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, अॅग्रिकल्चर, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, आंत्रप्रेन्योरशिप यापैकी कोणतेही तीन विषय घेता येतील.

बदललेल्या नियमांत असेल याचाही समावेश
- निर्धारित विषयांत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १२ वीत ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक. आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के गुण अनिवार्य. तेव्हाच बीई, बीटेकमध्ये प्रवेश मिळू शकेल.
- २०१९-२० मध्ये ज्या संस्थेत ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असेल अशीच संस्था नवा अभ्यासक्रम सुरू करू शकेल. इंजिनिअरिंग कॉलेज, विद्यापीठे, संस्था पारंपरिक किंवा अप्रासंगिक अभ्यासक्रमांच्या शाखा उघडू शकणार नाहीत.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार विद्यार्थ्यांना पहिल्या, दुसऱ्या वर्षापासूनच एखादी शाखा (स्ट्रीम) किंवा अभ्यासक्रम सोडून दुसऱ्यात प्रवेश घेण्याची सुविधा असेल.

बातम्या आणखी आहेत...