आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबाद:रा. स्व. संघाच्या प्रदर्शनात जिनांचे चित्र! 'आधी राष्ट्रभक्त, धर्माच्या नावावर केली फाळणी', अशी दिली कॅप्‍शन

अहमदाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची तीनदिवसीय बैठक शुक्रवारी अहमदाबाद येथे सुरू झाली. बैठक स्थळाजवळ भरवलेल्या प्रदर्शनात गुजरातमधील २०० विशेष व्यक्तींची चित्रे लावण्यात आली आहेत. यात पाकिस्तानचे संस्थापक मोहंमद अली जिना यांचेही चित्र आहे. जिना यांच्या फोटोजवळ लिहिले की ते आधी कट्टर राष्ट्रभक्त होते. तथापि, नंतर धर्माच्या आधारावर देशाची फाळणी केली.

शुक्रवारपासून सुरू झालेली प्रतिनिधी सभेची बैठक १३ मार्चपर्यंत चालेल. पिराना गावात होत असलेल्या या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे व भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांसह १२४८ प्रतिनिधी सहभागी होतील.

बापू, टाटा, अंबानी, पित्रोदा यांचीही नावे
या यादीत राष्ट्रपिता महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, धीरूभाई अंबानी, रतन टाटा, अझीम प्रेमजी, सॅम पित्रोदा, वर्गीस कुरियन, विक्रम साराभाई, मृणालिनी साराभाई, संजीव कुमार आणि डिंपल कापडिया यांचीही नावे समाविष्ट आहेत.

बातम्या आणखी आहेत...