आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम जन्मभूमी भूमीपूजन विशेष:400 वर्षांपूर्वी अयोध्येत तीर्थयात्रेस जाणाऱ्यास मिळत होती रामाची नाणी

आशिष दुबे | उज्जैनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उज्जैनमध्ये अशा प्रकारची 40 च्यावर दुर्मिळ नाणी

अयोध्येत राम मंदिराच्या पायाभरणीच्या कामाकडे संपूर्ण देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. या उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी लाखो रामभक्त उत्सुक आहेत. मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातही प्रभू श्रीरामचंद्राच्या अनेक दंतकथा ऐकण्यास मिळतात. शेकडो वर्षांपूर्वी उज्जैनसह माळवा येथील लोक अयोध्येला तीर्थयात्रेस जात होते. तेव्हा अयोध्येतील नाणी ही मंडळी सोबत आणत असत. संपूर्ण देशभरात उज्जैनच्या महिदपूर भागात ४० हून अधिक नाण्यांचा असा संग्रह आढळतो. प्रभू श्रीरामचंद्राच्या यशाचा व आदर्शाचा त्या काळात इतका प्रभाव होता की, मोगल सम्राट अकबराने १६ -१७ व्या शतकातील श्रीरामाचा आदर्श सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खास नाणी जारी केेली होती. महिदपूरच्या अश्विनी संशोधन केंद्रात या दुर्मिळ नाण्यांचा संग्रह आहे. ८० वर्षे जुन्या संस्थेचे संचालक व प्रसिद्ध चलन तज्ञ डॉ. आर.सी. ठाकूर यांनी सांगितले, १६ व्या शतकातील ही नाणी त्यांना वडील पर्वतसिंह यांच्याकडून मिळाली.

बातम्या आणखी आहेत...