आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानचे रण...:सभापतींच्या अपात्रतेच्या नोटिशीला पायलट गटाचे हायकोर्टात आव्हान

जयपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उच्च न्यायालयाचे खंडपीठ शुक्रवारी दुपारी 1 वाजता यावर सुनावणी करेल

राजस्थानातील राजकीय लढाई गुरुवारी न्यायालयात पोहोचली. सचिन पायलट आणि १८ इतर काँग्रेस आमदारांनी सभापती सी. पी. जोशींनी बजावलेल्या अपात्रतेच्या नोटीसला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाचे खंडपीठ शुक्रवारी दुपारी १ वाजता यावर सुनावणी करेल.

काँग्रेसच्या तक्रारीवरून दिलेल्या नोटिशीत सभापतींनी पायलट यांच्यासह १९ आमदारांकडून शुक्रवारीच उत्तर मागवले आहे. पायलट गटाने भीती व्यक्त केली आहे की, सभापती सी. पी. जोशी मुख्यमंत्री गहलोत यांच्या प्रभावात निर्णय घेतील. याचिकेत म्हटले आहे की, विधानसभेबाहेर काही काँग्रेस नेत्यांच्या निर्णय आणि धोरणांवरील असहमतीमुळे त्यांच्यावर पक्षांतरविरोधी कायदा लागू केला जाऊ शकत नाही.

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गैरहजर राहणे पक्षांतर नाही. संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार पक्षांतरविरोधी कायदा तेव्हाच लागू होतो, जेव्हा सदस्य मुद्दाम पक्षाचे सदस्यत्व सोडेल किंवा विधानसभेत पक्षाच्या निर्देशांविरोधात मतदान करेल. याचिकेवर आधी दुपारी ३ वाजता एकल पीठाने सुनावणी सुरू केली होती. मात्र, पायलट गटाच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी याचिकेत दुरुस्ती करण्यासाठी वेळ मागितली. सांगण्यात येते की, त्यांनी नोटीसऐवजी राजस्थान विधानसभा सदस्य (पक्ष बदलण्याच्या आधारावर अपात्रता) नियम, १९८९ ला आव्हान दिले आहे. संध्याकाळी ५ वाजता सुनावणी सुरू झाल्यावर न्यायाधीशांनी प्रकरण खंडपीठाकडे सुपूर्द केले. आधी संध्याकाळी ७.३० वाजता सुनावणी होण्याची शक्यता होती, मात्र त्या वेळी न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी केली नाही.

 

बातम्या आणखी आहेत...