आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pistols Made From Scrap, Sold At 15 To 55 Thousand, Pistols Smuggled From Badwani District

पिस्तुलांची तस्करी:भंगारामधून बनवतात पिस्तूल, 15 ते 55 हजारांमध्ये होते विक्री, बडवानी जिल्ह्यातून पिस्तुलांची तस्करी चालते

(मध्य प्रदेश) | तरुण चौहान बडवानी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ मराठवाडाच नव्हे, तर महाराष्ट्र व देशातील इतर राज्यांतही मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातून पिस्तुलांची तस्करी चालते. जिल्ह्यातील उमाठी गाव व पलसूद गावाजवळील उंडी खोद्री तसेच अंजर गावाजवळील नवलपुरा भागात भंगारच्या साहित्यातून पिस्तूल बनवले जातात. १५ हजार ते ५५ हजारांपर्यंत पिस्तुलांची विक्री होते.

येथील घनदाट जंगलांमध्ये आरोपी सतत जागा बदलून पिस्तुले बनवतात. कुलूप-चाव्या बनवण्याचा व्यवसाय करणारे काही लोकही पिस्तुलाच्या या अवैध व्यवसायात काम करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. दर महिन्याला येथे गावठी पिस्तूल बनवून विकताना किमान दोन ते तीन गुन्हे उघडकीस येतात. आरोपींनाही पकडले जाते. पण अवैध हत्यार निर्मिती आणि त्याची विक्री पूर्णपणे थांबलेली नाही. ज्या भागात गावठी कट्ट्याचे गुन्हे वाढलेले असतात तेथील पोलिस बडवानी येथे येऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुन्हेगारांना पकडण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्यांना यश येत नाही.

बातम्या आणखी आहेत...