आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PK's Influence On Congress's New Transformation Formulas, Brainstorming On Four Of The Five Issues Of Prashant Kishor

नवी दिल्ली:काँग्रेसच्या नव्या परिवर्तन सूत्रांवर ‘पीके’चा प्रभाव, प्रशांत किशोरांच्या पाचपैकी चार मुद्द्यांवर मंथन

नवी दिल्ली / उदयपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कार्यपद्धतीत बदल होण्याची चिन्हे असतानाच उदयपूरमध्ये पक्षाचे तीनदिवसीय चिंतन शिबिर सुरू झाले आहे. यामध्ये दीर्घकाळच्या निराशेवर मात करण्यासाठी ‘नवा संकल्प’ करण्याचा विचार केला जात आहे. २१ व्या शतकातील पक्षाचे तिसरे चिंतन शिबिर अशा वेळी आयोजित केले आहे, जेव्हा निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याशी “पुनरुज्जीवन योजना” तयार करण्यासाठी चर्चा पूर्ण झाली आहे. पण विचारमंथनाच्या पाच मोठ्या मुद्द्यांपैकी ४ वर ‘पीके’ फॉर्म्युल्याचा प्रभाव असल्याची कबुली पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. पक्षाने सोनिया गांधी यांचे निवासस्थान १० जनपथ येथे प्रशांत किशोर यांच्यासमवेत झालेली सुमारे २५ तासांची चर्चा व त्यांचे ८५ स्लाइड्सचे सादरीकरण बाजूला ठेवले आहे. पण त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचाच समावेश विचारमंथनात दिसून येत आहे.

अध्यक्षपदांच्या मुद्द्यावर तीन मते : काँग्रेसच्या चिंतन शिबिरात पक्षाध्यक्ष या मुद्द्यावर एकही खुले चर्चासत्र नाही. या मुद्द्यावर तीन मतप्रवाह आहेत - अध्यक्ष हा गांधी घराणेतर असावा किंवा सोनिया गांधी याच पक्षाध्यक्षपदी रहाव्यात. किंवा राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद पुन्हा सो पविण्यात यावे. सूत्रांच्या मते या सर्वात महत्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यावर अंतिम निर्णय गांधी कुटुंबीयांनीच घ्यायचा आहे.

या प्रस्तावांवर चर्चा:
- संस्थेतील एकूण पदांपैकी निम्म्यांवर ५० पेक्षा कमी वयाच्या नेत्यांना प्राधान्य.
- महागाईपासून ते शेतकरी, बेरोजगारी, आर्थिक मंदी, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, प्रादेशिक पक्षांनाही जोडण्याचे प्रयत्न आदी मुद्द्यांवर जनआंदोलन.
-तिकीट मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने किमान ५ वर्षे पक्षासाठी काम केलेले असणे आवश्यक आहे. एक कुटुंब एक तिकीट हा फॉर्म्युलाही लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर पक्षाच्या पदासाठी ३ वर्षांचा कमाल कालावधी असेल त्यातुळे इतरांना पक्षनेतेपदाची संधी मिळू शकेल.
- अल्पसंख्याक, दलित आणि ओबीसी वर्गातील नेत्यांसाठी ५० टक्के आरक्षण निश्चित करण्यात यावे, हा सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव आहे.

‘पीके’ सूत्रानुसार या मुद्द्यांवर चर्चा
- काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरचा नेता असावा. ते अधिक प्रभावी ठरेल. पक्षाचा अंतिम निर्णय गांधी परिवारच घेऊ शकतो.
- पक्षसंघटनेला तरुणांच्या विचारांचे स्वरूप दिलेे पाहिजे. संघटना “पेन्शनर मानसिकतेच्या” नेत्यांपासून मुक्त झाली पाहिजे.
- प्रत्येक स्तरावर पक्षात महिलांचा एक तृतीयांश सहभाग निश्चित करण्यात यावा.
- जनआंदोलन करण्याची काँग्रेसची गांधीवादी रणनीती पुन्हा अंगीकारली पाहिजे.

आता तत्काळ बदल हवा, सो निया गांधी यांचे मत
सोनिया गांधी म्हणाल्या की, देश कठीण टप्प्यातून जात आहे आणि अशा वेळी लोकांना आपल्या पक्षाकडून खूप आशा आहेत. त्यासाठी परिवर्तन ही गरज आहे. म्हणून तत्काळ बदल हवा.

बातम्या आणखी आहेत...