आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PLA Funded By China After Manipur Attack, PLA Plans To Make Manipur An Autonomous State

इंफाळ:मणिपूरमधील हल्ल्यामागील PLAला चीनमधून फंडिंग, पीएलएचे मणिपूरला स्वायत्त राज्य करण्याचे मनसुबे

इंफाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मणिपूरमध्ये शुक्रवारी लष्करावर झालेल्या हल्ल्याच्या दहा तासांनंतर दोन नक्षलवादी संघटना पीपल्स लिबरेशन आर्मी व मणिपूर नागा पीपल्स फ्रंटने जबाबदारी घेतली. वास्तविक पीपल्स लिबरेशन आर्मीच्या कारवायांना शेजारच्या देशाची फूस आहे. चीनमधून पीएलएला पैशाची रसद मिळत असल्याचे सांगण्यात येते. पीएलएची स्थापना २५ सप्टेंबर १९७८ मध्ये एन. बिश्वेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली झाली.

मणिपूरला भारतातून वेगळे करण्याचा मनसुबा जाहीर करून मैते, नागा, कुकी समुदायांच्या एकजुटीवर भर देण्यात आला. म्यानमारमध्ये दोन व बांगलादेशात पाच प्रशिक्षण छावण्या चालवल्या जातात. त्यात सुमारे १ हजार जणांनी अत्याधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण घेतले आहे. सुरक्षा दलाने थॉवलच्या टेकचममध्ये एक पीएलए छावणीवर छापा टाकून जवळपास सर्व आघाडीच्या नेत्यांना ठार केले. ६ जुलै १९८१ मध्ये बिशेश्वरलादेखील अटक करण्यात आली होती. पीएलए नक्षलींनी ८ एप्रिल १९८९ मध्ये इंफाळजवळ सनदी अधिकारी वंदना मलिक यांची हत्या केली होती. जानेवारी १९९१ च्या दस्तऐवजानुसार पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी या संघटनेचे संबंध होते. या दहशतवाद्यांनी भारतात आपली संघटना बळकट करण्यासाठी चीनमधूनदेखील मोठा निधी दिला जात आहे. भारताने सरकारने या संघटनांना दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...