आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Plan To Make 'Amrit Sarovar' In Every District Of Uttar Pradesh, Inauguration Of First Lake In Rampur

रामपूर:उत्तर प्रदेशात प्रत्येक जिल्ह्यात ‘अमृत सरोवर’ करण्याची योजना, पहिल्या सरोवराचे रामपूरमध्ये उद्घाटन

रामपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील पहिल्या ‘अमृत सरोवरा’चे शुक्रवारी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी जलशक्ती मंत्री स्वतंत्र देव सिंग यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम पटवाई (रामपूर) येथे पार पडला. अशा प्रकारचे राज्यात एकूण ७५ अमृत सरोवरे बांधली जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत काळानिमित्त जलसंवर्धन व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशातून सरकारने हा संकल्प केला आहे. याप्रसंगी नक्वी म्हणाले, लोकांचा सहभाग, सहकार्यातून हे सरोवर कमी कालावधी प्रत्यक्षात येऊ शकले. या सरोवरामुळे केवळ पर्यावरणाचे संरक्षणच नव्हे तर जलसंवर्धनाचा प्रश्नही सुटू शकेल.

बातम्या आणखी आहेत...