आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लाझ्मा थेरपी:कोरोना संसर्ग, मृत्यू टाळण्यासाठी प्लाझ्मा थेरपी लाभदायक नाही !

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयसीएमआरचे मत, उपचारांच्या मार्गदर्शक तत्त्वातूनही काढणार

कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असला तरी कोरोना संसर्गाचे गांभीर्य कमी करणे किंवा मृत्यू टाळण्यासाठी ही थेरपी फार लाभदायक ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना उपचारांतील वैद्यकीय निर्देशांतून ही थेरपी काढून टाकली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय कृतिदलाच्या बैठकीत सर्वच सदस्यांनी यावर सहमती दर्शवली आहे. या सदस्यांच्या मते, वयस्कर रुग्णांवर कोरोनाचे उपचार केले जात असताना प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याचे उपचारांतील निर्देश काढून टाकले पाहिजेत. कोणत्याही दृष्टीने प्लाझ्मा थेरपी गुणकारी ठरू शकलेली नाही. शिवाय, अनेक प्रकरणांत या थेरपीचा चुकीचा वापर केला गेला आहे.

सूत्रांनुसार, आयसीएमआर लवकरच याबाबतचे नवे निर्देश काढेल. सध्याच्या निर्देशांनुसार, लक्षणे सुरू झाल्यानंतर सात दिवसांच्या आत आजार मध्यम स्वरूपात असेल तर या प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गंभीर रुग्णांच्या रक्तामध्ये अँटिबॉडीज वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. पूर्वीच्या या मार्गदर्शक तत्त्वांमुळे देशभरात प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात होता.

सल्लागार म्हणतात, शास्त्रीयदृष्ट्या ही थेरपी अयोग्य
काही डॉक्टर व शास्त्रज्ञांनी याबाबत प्रमुख शास्त्रज्ञ-सल्लागार के. विजय राघवन यांना पत्र पाठवून प्लाझ्मा थेरपी अतार्किक असल्याचे म्हटले होते. शिवाय, याचा शास्त्रशुद्ध वापर होत नसल्याने इशाराही दिला होता. हे पत्र आता आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव व एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रावर व्हॅक्सिनोलॉजिस्ट गगनदीप कंग, सर्जन प्रमेश सीएस आणि इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...