आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहापूरमध्ये अवैधपणे सुरू असणाऱ्या फटाक्याच्या एका कारख्यान्यात शनिवारी भीषण स्फोट झाला. त्यात 11 मजूर ठार, तर 13 जण जखमी झाले. जखमींवर दिल्लीच्या सफदरजंग व मेरठ स्थित रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारखान्यातील दारुगोळ्यात स्फोट झाल्याने ही घटना घडली. घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कारखान्याला विजेचे साहित्य तयार करण्याचा परवाना होता. पण, त्यात फटाके तयार केले जात होते.
घटनास्थळी पोहोचलेल्या आयजी प्रविण कुमार यांनी सांगितले की, "औद्योगिक यूनिटमध्ये स्फोट झाला. कारखान्याला इलेक्ट्रॉनिक इव्क्विपमेंट तयार करण्याचा परवाना होता. पण, त्यात अवैधपणे फटाके तयार केले जात होते. या प्रकरणी नियमांच्या झालेल्या उल्लंघनाचा तपास केला जाईल. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल."
आसपासच्या कारखान्यांचे छत उडाले
घटनास्थळी जमलेल्या लोकांनी सांगितले की, या कारखान्यात प्लास्टिकची बंदूक व त्यात लागणारी दारू तयार केली जात होती. शनिवारी दुपारी अचानक स्फोट झाल्याने मजूर अत्यंत वाईट पद्धतीने होरपळले. स्फोट एवढा भीषण होता की, आसपासच्या कारखान्यांचेही छत उडाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश देत पीडित कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.