आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Plea In Delhi High Court । Seeking Stay On Covaxin । Phase 2 Or 3 Clinical Trial । On 2 To 18 Age Group; News And Live Updates

मुलांवरील लसीची चाचणी थांबवा:दिल्ली उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी; लहान मुलांवर लसीची चाचणी घेणे म्हणजे नरसंहार - याचिकाकर्ता

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांना स्वयंसेवक म्हणणे चुकीचे आहे, ते परिणाम समजू शकत नाहीत - याचिकाकर्ता

देशात केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लहान मुलांवरील लस चाचणीला परवानगी दिली आहे. पंरतु, या निर्णयाविरोधात दिल्ली येथील याचिकाकर्ता संजीव कुमारने उच्च न्यायालयात धाव घेत ही चाचणी त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, याचिकाकर्त्याने 2 ते 18 वर्षांच्या मुलांवरील लसीच्या चाचणीला नरसंहार म्हणून संबोधले. या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

ही याचिका उच्च न्यायालयासमोर असून यामध्ये केंद्र सरकार आणि भारत बायोटेकलादेखील नोटीस पाठवल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. परंतु, तरीदेखील जूनपासून लहान मुलांवरील लस चाचणीला परवानगी देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) कोव्हॅक्सिनच्या मुलांवर फेज 2 आणि 3 चाचणीसाठी भारत बायोटेकला मान्यता दिली होती.

मुलांना स्वयंसेवक म्हणणे चुकीचे आहे, ते परिणाम समजू शकत नाहीत - याचिकाकर्ता
ज्या मुलांवर ही लस चाचणी केली जात आहे, त्यांना स्वयंसेवक समजणे चुकीचे आहे. कारण त्या मुलांमध्ये सध्या चाचणीचे निकाल समजून घेण्याची क्षमता नसल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. एखाद्या निरोगी मुलांवर ही चाचणी घेणे म्हणजे त्याचे नरसंहार करणे होय. ते पुढे म्हणाले की, जर यामध्ये एखाद्या निष्पाप मुलाचे जीव गेल्यास संबंधित लोकांवर फौजदारी खटला चालवला जावा अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे.

या लस चाचणीमुळे लहान मुलांच्या शाररिक आणि मानसिक आरोग्यवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही चाचणी तात्काळ थांबवली जावी असे याचिकाकर्ता संजीव कुमारने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...