आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Plots In Ayodhya Became 10 Times More Expensive, 20% Of Land Use Changed; Work On 136 Projects On Ayodhya Lucknow Highway Underway

नवी अयोध्या आशेची:अयोध्येत भूखंड 10 पट महागले, 20% घरांच्या जागावापराचे स्वरूप बदलले; अयोध्या-लखनऊ महामार्गावर 136 प्रकल्पांचे काम सुरू

प्रमोद कुमार | अयोध्या9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयोध्या रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यासाठी 104 कोटींचा खर्च. - Divya Marathi
अयोध्या रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यासाठी 104 कोटींचा खर्च.
  • राममंदिर निकालानंतर वर्षभरात अयोध्येचे रूप पालटले...कोरोनाकाळातही रोज येताहेत 20 हजार पर्यटक

पूर्वी अयोध्येतील लोक म्हणत, रामाच्या आधी पोटासाठी भाकरी पण गरजेची आहे. आता येथे रामही आहे आणि भाकरही. रामलल्ला विराजमानच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन ९ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होईल. यानंतर अयोध्येत खूप मोठे बदल होत आहेत. पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक पदरी मार्ग दुपदरी झाले आहेत. अनेक चौपदरी मार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. आधी पायाभूत सुविधा असोत की इतर सर्व प्रकल्प लखनऊजवळच व्हायचे. आता मात्र विकास प्रकल्प अयोध्येकडे सरकले आहेत. आधी अयोध्येत भूखंड बिस्वानुसार विकले जायचे. एक बिस्वा म्हणजे १३६१ चौरस फूट. आता भूखंड मोठ्या शहरांप्रमाणे चौरस फुटात विकले जात आहेत.

शहरातील जमिनीचे दर १० पट तर ग्रामीण भागातील जमिनीचे दर ५ पट वाढले आहेत. आधुनिक शहरांप्रमाणे वीज तारा भूमीगत करण्यात आल्या. शहरातून जाणारी उच्च दाब वाहिनी शरयूच्या पलिकडे नेण्यात आली. या कोरोना काळातही रोज सरासरी २० हजार जण अयोध्येत येत आहेत. आधी हंगामात रोज २ हजार जण यायचे. पर्यटकांची संख्या वाढल्याने कोरोना काळातही लोक बेरोजगार झाले नाहीत. अयोध्याचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा सांगतात की, वैद्यकीय महाविद्यालय असो की रस्ता रुंदीकरण, राम की पौडी, गुप्तार घाटाचा विकास करण्यात आला.

रामजन्मभूमी ट्रस्टचे विश्वस्त कमलेश्वर चौपाल सांगतात, पुरातन वारसा टिकवून ठेवण्याकडे आमचे लक्ष राहिल. मात्र, आधुनिक काळाच्या दृष्टीने लोकांची संख्या व सुविधांकडे लक्ष द्यावे लागेल. हिंदू- मुस्लिम तणावाशिवाय प्रेमाने अयोध्येत राहतात हे संपूर्ण जगाला कळले आहे. आज देशातील प्रत्येक उद्योगपतीला अयोध्येत व्यवसाय करायचा आहे. व्हेटिकन सिटी किंवा मक्काचे रुप बदलले नाही का? देशात आलेल्या परदेशी पर्यटकांना ऊर्जा मिळायला हवी. सुविधा मिळाव्यात. गर्दीमुळे अनेक ठिकाणी विचित्र घटना घडल्या, त्या थांबवल्या जाव्यात. सध्याची २० हजार पर्यटकांची संख्या मंदिर झाल्यानंतर १० लाखांवर जाईल. तणावामुळे अयोध्येतील डॉ. योगेंद्र लखनऊला निघून गेले होते. त्यांचे वडिलोपार्जित घर अयोध्येत आहे मात्र ते पडून आहे. ते त्यांना विकायचे होते. मात्र, गिऱ्हाईक येत नव्हते. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी मंदिराच्या बाजूने निकाल आल्याने आता घर खरेदीसाठी चौकशी होऊ लागली आहे. काही दिवसांनंतर त्यांच्या घराला दुप्पट किंमत द्यायला लोक तयार झाले. डॉ. योगेंद्र आता त्यांच्या घराला हाॅटेल करत आहेत. व्यवसायाची अयोध्येत लखनऊपेक्षा जास्त संधी असल्याने त्यांनी अयोध्येऐवजी लखनऊतील घर विकायचा निर्णय घेतला आहे. अशाच प्रकारे डॉ. व्ही. पी. पांडेंना दिल्लीतील एका प्रख्यात कार्डिओलॉजिस्टचा फोन आला. त्यांना अयोध्येत रुग्णालय बांधण्यासाठी तीन एकर जमीन हवी असल्याचे सांगितले. ही केवळ दोन उदाहरणे नाहीत. असे शेकडो जण आहेत ज्यांना अयोध्येत यायचे आहे.

अन् एक वर्षात गुन्हेगारीही कमी

अयोध्या ठाण्याचे प्रभारी रामप्रकाश मिश्रा सांगतात की, मागील एक वर्षात अयोध्या पोलिस ठाण्याचा ग्राफ खाली आला आहे. लहानमोठ्या घटना वगळता मोठी घटना घडली नाही. मणी पर्वत भागाला नेहमीच गुन्हेगारांचा गड म्हटले जायचे. मात्र, पीएसी कॅम्पमुळे तेथेही शांतता आहे.

सामान्य व्यक्ती : 20% घरांचा भूमीवापर बदलला. 10% हॉटेल-स्टे होममध्ये रुपांतरीत. भूमीवापरासंदर्भातील कार्यवाही वेगाने केली जात आहे.

उद्याेगपती : 136 मोठे प्रकल्प अयोध्या- लखनऊ महामार्गावर होत आहेत. यात 10 पंचतारांकित हॉटेल, 7 रुग्णालय, 5 शॉपिंग मॉल आहेत.

समाजकार्य : 02 धर्मशाळा होत्या ट्रस्टच्या आधी अयोध्येत. मात्र, आता देशातील मारवाडी, शीख, जैन धर्मीय लोक येथे जमीन घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...