आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM CARES Fund Has Given Approval For Funds For Installation Of 551 Oxygen Generation Plants Inside Public Health Facilities

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑक्सीजनप्रकरणी केंद्र अॅक्शन मोडमध्ये:PM केअर्स फंडातून देशभरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये 551 ऑक्सीजन प्लांट लागणार

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधानांनी याबाबत शनिवारी आढावा बैठक घेतली होती

देशात वाढत असलेल्या ऑक्सीजनच्या मागणीमुळे नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्मय घेतला आहे. या निर्णयानुसार, देभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये 551 ऑक्सीजन प्लांट लावले जाणार आहेत. हे ऑक्सीजन प्लांट लावण्यासाठी PM केअर्स फंडचा वापर केला जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, रुग्णालयातील ऑक्सीजन वाढवण्यासाठी PM केअर्स फंडने सार्वजनिक आरोग्य सुविधेत 551 डेडिकेटेड प्रेशर स्विंग अँड्सॉर्प्शन मेडिकल ऑक्सीजन जेनरेशन प्लांट लावण्यासाठी फंडला मंजुरी दिली आहे.

पंतप्रधानांनी घेतली होती आढावा बैठक

यापूर्वी, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील ऑक्सीजनची उपलब्धता वाढवण्यासाठी आढावा बैठक घेतली होती. यात त्यांनी मेडिकल ग्रेड ऑक्सीजनची क्षमता वाढवण्यासोबतच घर आणि रुग्णालयातील रुग्णांसाठी लागणाऱ्या महत्वाच्या वस्तुंची पुर्तता करण्यावर जोर दिला होता. त्यांनी सर्व मंत्रालय आणि विभागांना ऑक्सीजन आणि मेडिकल सप्लायच्या उपलब्धतेसाठी कामात ताळमेळ ठेवण्यास सांगितले होते. हा निर्णयदेखील घेण्यात आला होता की, 3 महीन्यांसाठी ऑक्सीजनशी संबंधित वस्तु आणि उपकरणांच्या आयातीवर बेसिक कस्टम ड्यूटी आणि हेल्थ सेस लावला जाणार नाही. याबाबत मोदींनी महसूल विभागाला अशा उपकरणांच्या इंपोर्टवर लवकरात लवकर कस्टम क्लीयरेंस देण्याचे निर्देश दिले होते. हा निर्णयदेखील घेण्यात आला होता की, कोरोनाच्या लसींच्या आयातीवरील बेसिक कस्टम ड्यूटीला 3 महीन्यांसाठी बंद केलेजावे.

बातम्या आणखी आहेत...