आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक:पंतप्रधानांनी आज सायंकाळी 5 वाजता बोलावली बैठक, 20 पक्ष होणार सहभागी, आप आणि आरजेडीला निमंत्रण नाही

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार काय करतेय याविषयी सर्वपक्षीय बैठकीत सांगणार मोदी, दुसऱ्या पक्षांचेही घेणार मत

चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी आज सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये 20 प्रमुख पक्षांचे नेता सहभागी होतील. व्हिडिओ कॉन्फ्रेसच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीमध्ये सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जीसह सर्व प्रमुख पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. आम आदमी पार्टी आणि आरजेडीने दावा केला आहे की, त्यांना बोलावण्यात आले नाही.

न्यूज एजेंसी एएनआयच्या सूत्रांनुसार, 4 क्रायटेरियाच्या आधावर ऑल पार्टी मीटिंगसाठी इनव्हिटेशन देण्यात आले आहे.

  1. सर्व नॅशनल पार्टी
  2. ज्या पक्षाचे पाच सदस्य लोकसभेत आहे
  3. नॉर्थ-ईस्टचे प्रमुख पक्ष
  4. ज्या पक्षांचे नेते केंद्रीय कॅबिनेटमध्ये सामिल आहेत

या आधारावर 20 पक्ष आजच्या मीटिंगमध्ये सहभागी होणार आहेत. 

आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी ट्विट करत प्रश्न केला आहे की, आरजेडीचे 5 खासदार असुनही पक्षाला सर्वपक्षीय बैठकीत का बोलावले नाही? अखेर क्रायटेरिया काय आहे? आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह म्हणाले की, केंद्रामध्ये एक विचित्र अहंकारग्रस्त सरकार चालते आहे. कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर भाजपाला आपचा सल्ला नकोय.

गेल्या 2  सर्वपक्षीय बैठका राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या होत्या 

देशाच्या सीमांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर 6 वर्षातील ही तिसरी सर्वपक्षीय बैठक होणार आहे. गेल्या वर्षी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व पक्षांची 16 फेब्रुवारी 2019 रोजी बैठक झाली होती. यापूर्वी 29 सप्टेंबर, 2016 रोजी पीओके मध्ये सर्जिकल स्ट्राइकनंतर बैठक घेतली होती. तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही बैठका घेण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी चीनच्या मुद्द्यावर होत असलेल्या बैठकीत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अध्यक्षपदी असणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...