आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:आपत्ती निधीतील निम्मी रक्कम काेरोना लढ्यात खर्चण्यासाठी राज्यांना परवानगी, 9 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर पंतप्रधानांचा निर्णय

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारांना केंद्राच्या निर्णयामुळे मोठा दिलासा

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या राज्य सरकारांना केंद्राच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्राने गुरुवारी सांगितले की, राज्यांना आपत्ती प्रतिक्रिया कोषातील (एसडीआरएफ) निम्म्या रकमेचा वापर राज्यात क्वाॅरंटाइन सुविधा, टेस्टिंग लॅब, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व व्हेंटिलेटर, पीपीई किटच्या खरेदीसाठी करता येईल.

पंतप्रधान मोदींनी ७ सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर केंद्राने हा निर्णय घेतला. चर्चेत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी आपत्ती कोषातून खर्च करण्याची मर्यादा ५० टक्के करण्याची मंजुरी मागितली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, एसडीआरएफमधील ५० टक्क्यांपर्यंतची रक्कम कोरोना नियंत्रणासाठी खर्च करता यावी म्हणून वस्तू व नियमांच्या यादीत अंशत: दुरुस्ती केली आहे.

बिदरचे आमदार नारायण राव यांचे कोरोनाने निधन
बंगळुरू | कर्नाटकच्या बिदरचे काँग्रेस आमदार नारायण राव यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी बंगळुरूच्या रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. काेरोनामुळे प्रकृती खालावल्यानंतर ६५ वर्षीय राव यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाले होते. यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

सिक्कीम सीएमच्या पत्नी व मुलाला कोरोना, घरीही ९ जणांना संसर्ग
गंगटोक | सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यांची पत्नी कृष्णा व मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच इतर ९ जणही बाधित झाले.

बातम्या आणखी आहेत...