आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सरकार पुढचा हप्ता देण्याच्या तयारीत आहे. पीएम किसान सम्मान योजनेचा शेतकऱ्यांना आतापर्यंत दहा हफ्ते मिळाले आहेत. शेतकऱ्यांना आता अकराव्या हप्ताची प्रतिक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा पुढचा हप्ता हा एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची मदत केली जाते. केंद्र सरकारने आतापर्यंत 10 हफ्ते शेतकऱ्यांना दिले आहेत. मात्र अनेक शेतकरी असे आहेत की, ते योजनेला पात्र असून, देखील त्यांना लाभ मिळत नाही. जर आपण आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान योजनेत सहभाग घेतला नसेल, तर तात्काळ नोंदणी करुन घ्या. जेणेकरुन आपल्याला 2000 रुपयांचा हप्ता मिळू शकेल.
अशी करा नोंदणी
ही कागदपत्रे आवश्यक
जमिनीचा सातबारा बँकेचा पासबुक मतदान कार्ड पासपोर्ट साइझ फोटो ओळखपत्र निवासी प्रमाणपत्र
या वेबसाइटवर करा नोंदणी
या शेतकऱ्यांच्या नावावर दोन हेक्टर जमीन आहे. ते या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांना www.pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे.
या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला किसान कॉर्नर’ म्हणून एक पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या समोर काही पर्याय येतील त्यात तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक रजिस्ट्रेशन फॉर्म आले असेल.
आता आपल्याला तो फॉर्म न चुकता भरायचा आहे. फॉर्म पुर्ण भरल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.