आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 11 वा हप्त्याची प्रतिक्षा देशातील 12.5 कोटी शेतकऱ्यांनी लागली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा 10 वा हप्ता जानेवारीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता.
गेल्या वर्षी 15 मे ला मिळाला होता हप्ता
पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जुलै महिन्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 15 मे ला किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. मात्र, यावर्षी हप्ता कधी येणार याबाबात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे सरकारने पीएम किसानची e-KYC करण्याची तारीख वाढवली असून, 31 मे पर्यंत केली आहे. पुर्वी सरकारकडून केवायसी करण्यासाठी 31 मार्चचा कालावधी देण्यात आला होता. अशा परिस्थितीत, खालील 5 कारणांमुळे पीएम किसान निधीचा हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो.
कारण क्रमांक 1 - e-KYC
यावर्षी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेसाठी केवायसी करण्यास बंधनकारक केले आहे. त्यामुळे 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला e-KYC करण्यासाठी 31 मार्चचा कालावधी देण्यात आला होता, मात्र त्यानंतर त्याचा कालावधी वाढवून 31 मे पर्यंत करण्यात आला.
कारण क्रमांक 2 -शेतीयोग्य जमीन
योजनेच्या सुरुवातीला, 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेले शेतकरी पीएम किसान निधीसाठी पात्र होते. मात्र आता हे शेतकरी पात्र राहणार नाहीत. आता सर्व शेतकरी या योजनेत नोंदणी करू शकतात. त्यामुळे हा बदल 11 व्या हप्त्याला उशीर होण्याचे कारणही असू शकते.
कारण क्रमांक 3: अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली
सरकारी नोकरी करणारे किंवा कर भरणारे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र नाहीत. गेल्या काही दिवसांत अशी प्रकरणे समोर आली होती की, सरकारी नोकरी करणाऱ्यांनाही पीएम किसान फंड मिळत आहे. अशा लाभार्थ्यांना निधीचे पैसे परत करण्यास सांगितले आहे. 11 व्या हप्त्याला उशीर होण्याचे हे कारण देखील असू शकते.
कारण क्रमांक 4: किसान क्रेडिट कार्डमध्ये बदल
किसान क्रेडिट कार्ड ही भारत सरकारची योजना आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना माफक दरात कर्ज देण्याची सुविधा शेतकऱ्यांना दिली जाते. ही योजना पीएम किसानशी जोडली जात आहे. पीएम किसान निधीच्या हप्त्याला उशीर होण्यामागे हे देखील कारण असू शकते.
कारण क्र. 5: किमान पेपरवर्क
ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारकडून भौतिक पडताळणी केली जात आहे. यानंतर शेतकरी आधार कार्डाच्या मदतीने घरी बसूनही या योजनेत नोंदणी करू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.