आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Kisan Yojana ; PM Modi Will Release 9th Installment Today, 9.75 Crore Farmers Will Get Benefit; News And Live Updates

पंतप्रधान किसान योजना:पंतप्रधान मोदी यांनी आज जारी केला 9 वा हप्ता; 9.75 कोटी शेतकऱ्यांना मिळाला लाभ

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 9.75 कोटी शेतकऱ्यांना मिळाला लाभ

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 9 वा हप्ता जारी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा केला आहे. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात भाग घेतला होता.

9.75 कोटी शेतकऱ्यांना मिळाला लाभ
देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रान किसान योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो. यावेळी योजनेअंतर्गत 9.75 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे 9.75 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 19,508 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहे.

केशरचे उत्पन्न झाले दुप्पट
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय केशर मिशन अंतर्गत उभारलेल्या केशर पार्कच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, मोदींनी शेतकरी अब्दुलला विचारले की, यामुळे त्यांच्या उत्पन्नात किती वाढ झाली. केशर पार्कमुळे केशरच्या लागवडीतून उत्पन्न दुप्पट झाले. केशरी पार्कच्या निर्मितीमुळे काश्मिरी केशराला नवी ओळख मिळाली असल्याचे अब्दुल यांनी सांगितले. केशरचा वास जगापर्यंत पोहोचवणे हे केशर पार्क उभारण्याचे ध्येय असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

2019 मध्ये सुरू झाली होती योजना
2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकर्‍यांना वर्षाला तीन वेळा 2-2 हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) मार्फत नोंदणी करू शकतात. याशिवाय या योजनेसाठी पटवारी, महसूल अधिकारी व राज्य शासनाने नेमलेले फक्त नोडल अधिकारीच शेतकऱ्यांची नोंदणी करीत आहेत. आतापर्यंत सुमारे 11 कोटी शेतकर्‍यांना याचा फायदा झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...