आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात पंतप्रधान मोदी:वाघ-सिंहांच्या संरक्षणासाठी पीएमच्या हस्ते बिग कॅट्स अलायन्सचा प्रारंभ

म्हैसूर (कर्नाटक)|2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्सची सुरुवात केली. त्याचा उद्देश बिग कॅट परिवारातील ७ प्रमुख प्रजातींची सुरक्षा व संरक्षण करणे होय.

प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मोदी म्हणाले, भारतात २०२२ मध्ये ३,१६७ वाघ होते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना जगातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के भारतात आहेत, हा योगायोग आहे. वाघ संरक्षित क्षेत्र ७५,००० चौरस किमी एवढे आहे. १०-१२ वर्षांत देशात वाघांची संख्या ७५ टक्क्यांनी वाढली. मोदींनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पालाही भेट दिली. जीप सफारीही केली.