आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Modi 7th Man Ki Baat : Prime Minister Modi Said Parliament Legitimized Agricultural Reforms, Which Gave Farmers Opportunities And Rights

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मन की बात:पंतप्रधान मोदी म्हणाले - संसदेने कृषी सुधारणांना कायदेशीर रुप दिले, यामुळे शेतकऱ्यांना संधी आणि अधिकार मिळाले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रेडिओ कार्यक्रम मन की बात द्वारे म्हटले की, भारतातील शेती आणि संबंधित गोष्टींमध्ये नवीन परिमाण जोडले जात आहेत. अलिकडेच झालेल्या कृषी सुधारणांनी शेतकऱ्यांसाठी नवीन शक्यतांची दारे उघडली आहेत. वर्षानुवर्षांपासून शेतकर्‍यांच्या ज्या मागण्या होत्या, ज्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एकेकाळी प्रत्येक वेळी राजकीय पक्षाकडून देण्यात आल्या त्या पूर्ण करण्यात आल्या. बरीच विचारविनिमयानंतर संसदेने कृषी सुधारणांना कायदेशीर रुप दिले. या सुधारणांमुळे केवळ शेतकर्‍यांचे बंधन संपले नाही, तर त्यांना संधी आणि अधिकार मिळाले आहेत.

शेतकऱ्यांसाठी तरुणांना आवाहन

मोदी म्हणाले की, शेतीचा अभ्यास केल्यानंतर आपल्या आसपासच्या शेतकर्‍यांशी संबंधित गोष्टी तरुणांनी समजावल्या पाहिजेत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊल. एका वर्षापूर्वी आपल्याला कोरोनाबद्दल माहीत झाले होते. आता लसीबाबत चर्चा होत आहे. पत्र निष्काळजीपण घातक आहे.

अरबिंदोंच्या बहाण्याने व्होकल फॉर लोकलचा मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमताद्वारे देशाला संबोधिक केले. या कार्यक्रमात ते म्हणाले की, आज आपण सर्व आत्मनिर्भर भारताविषयी बोलत असताना तेव्हा महर्षी अरबिंदो आठवतात. त्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास सांगितले होते. अरबिंदो यांनी परदेशांकडून शिकण्यास विरोध केला नाही. हीच आत्मनिर्भर भारताच्या व्होकल फॉल लोकची भावना आहे. राष्ट्राचे शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या हृदयाचे आणि मनाचे प्रशिक्षण असले पाहिजे, असे अरबिंदो म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी शिक्षणाबद्दल जे सांगितले ते आज आपण नवीन शिक्षण धोरणाद्वारे करीत आहोत.

दोन परदेशी लोकांना प्रेरणा सांगितले

मोदींनी सांगितले की, जोनस ब्राझीलमध्ये लोकांना उपनिषद शिकवतात. ते 4 वर्षे तमिळनाडूच्या गुरुकुलमध्ये राहिले. ते स्टॉकपासून स्प्रिचुअलिटीपर्यंत आपला संदेश तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेतात. त्यांनी आतापर्यंत 1.5 लाख विद्यार्थ्यांना शिकवले आहे. न्यूझीलंडचे खासदार गौरव शर्मा यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. ते नवीन यश प्राप्त करतील अशा आपण प्रार्थना करू.

गुरुपर्वावर प्रकाश दिन साजरा करू

मोदी म्हणाले की, उद्या गुरुनानक देव यांचा 551 प्रकाश दिवस साजरा करू. जगभरात त्यांचे संदेश ऐकले जातात. सेवकाचे काम सेवा करणे आहे असे ते म्हणायचे. गेल्या काही वर्षांत सेवा करण्याच्या अनेक संधी आल्या आणि गुरु साहेबांनी आपल्याकडून अनेक सेवा करवून घेतल्या. गुरु साहेबांच्या कृपेने मला सेवा करण्यासाठी जवळून जोडले. कच्छ येथील गुरुद्वाराची दुरुस्ती करण्यात आली. याचे यूनेस्कोने देखील कौतुक केले. या गुरुद्वारात अर्मयात शांतता मिळते.

करतारपूर कॉरिडोरचे उद्घाटन ऐतिहासिक होते

मागील वर्षी करतारपूर कॉरिडोरचे उद्घाटन ऐतिहासिक होते. हे भाग्य आहे की आम्हाला दरबार साहिबची सेवा करण्याचा बहुमान मिळाला. मानवतेची सेवा करण्याची ही परंपरा आपल्यासाठी प्रेरणादायक ठरत आहे.

खुशखबर, अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतात येत आहे

मोदी म्हणाले की मला देशातील जनतेला एक चांगली बातमी सांगायची आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती कॅनडातून भारतात येत आहे. सुमारे 100 वर्षांपूर्वी 1913 मध्ये वाराणसी येथून चोरून पाठवली होती. देवी अन्नपूर्णेचा काशीसोबत घनिष्ठ संबंध आहे. ही मूर्ती परत येणे आपल्यासाठी सुखद आहे. मूर्तीची चोरी करणाऱ्यांवर कडक शासन केले जात आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser