आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंसदेच्या हिवाळी अधिवेशानाला आजपासून सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचले. अधिवेशन सुरू होण्याआधी त्यांनी संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय पक्षांना नवीन खासदारांच्या वेदना समजून घेण्याचे आणि संसदेत व्यत्यय टाळण्याचे आवाहन केले आहे. हिवाळी अधिवेशन पुर्णवेळ चालावे. संसदेची प्रतिष्ठा, अध्यक्षांची प्रतिष्ठेबाबत चांगले आचरण व्हावे आणि अधिवेशनात तरुण खासदारांनी अधिक सक्रिय प्रश्न मांडावेत, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जागतिक मंचावर भारताने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. G-20 परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळणे हे मोठी उपलब्धी आहे. याद्वारे भारताचे सामर्थ्य जगासमोर मांडण्याची संधी मिळाली.
संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनात एकूण 17 कामकाजाचे दिवस असतील. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी केंद्राच्या अजेंड्यात 16 नवीन विधेयकांचा समावेश आहे. लोकसभेच्या पहिल्या दिवशी नुकतेच निधन झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. यामध्ये समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायमसिंह यादव यांचाही समावेश आहे. ज्यांचे दीर्घ आजारानंतर ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. लोकसभेचे कामकाज आज तासभरासाठी तहकूब करण्यात आले. अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाच्या खासदारांनी ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार मुलायमसिंग यादव यांच्या सन्मानार्थ सभागृह अर्ध्या दिवसासाठी तहकूब करण्याची विनंती सभापतींना केली होती.
दुसरीकडे, विरोधी पक्षांची बैठक झाली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी संसदेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात ही बैठक झाली आहे. या बैठकीत टीएमसीचाही सहभाग होता. विरोधकांनी महागाई, बेरोजगारी, चीन सीमेवरील स्थिती, सरकारी संस्थांचा दुरुपयोग, एम्सवरील सायबर हल्ला, काश्मीर पंडितांवरील हल्ले, ईडब्ल्यूएस कोटासह विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी वेळ मागितला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.