आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवसानिमित्त आईला भेटण्यासाठी पोहोचले मोदी:आईचे पाय धुवून केली पूजा, नंतर डोळ्यांना पाणी लावून घेतले आशीर्वाद

वडोदरा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आई हीराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदाबादला पोहोचले आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या आईचे पाय धुतले, पूजा केली आणि त्यानंतर डोळ्यांना पाणी लावून आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदींच्या आईनेही वाढदिवसानिमित्त भेटायला आलेल्या मुलाचे तोंड गोड केले.

पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन आज 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यावेळी पाहा पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईमधील बॉन्डिंग दाखवणारी ही छायाचित्रे...

आई हीराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले, त्यांनी आईचे पाय धुतले.
आई हीराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले, त्यांनी आईचे पाय धुतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईचे पाय धुतल्यानंतर पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईचे पाय धुतल्यानंतर पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले.
प्रत्येक वाढदिवसाला पंतप्रधान मोदी त्यांच्या आईसोबत असतात, शनिवारीही ते त्यांच्यासोबत होते.
प्रत्येक वाढदिवसाला पंतप्रधान मोदी त्यांच्या आईसोबत असतात, शनिवारीही ते त्यांच्यासोबत होते.
पंतप्रधान मोदींनी आई हीराबेन यांना वाढदिवसानिमित्त शाल देऊन त्यांचे तोंड गोड केले.
पंतप्रधान मोदींनी आई हीराबेन यांना वाढदिवसानिमित्त शाल देऊन त्यांचे तोंड गोड केले.

गुजरातमध्ये मातृशक्ती योजनेची सुरुवात
शनिवारी पावागड येथील महाकालीचे दर्शन घेतल्यानंतर मोदी हे हेरिटेज वनातील लोकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर वडोदराला रवाना होणार. तेथे 'गुजरात गौरव अभियान' कार्यक्रमांतर्गत 21 हजार कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विभागांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार आहे. या कार्यक्रमात ते 'मुख्यमंत्री मातृशक्ती योजना' (MMY) लाँच करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...