आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi At CBI Diamond Jubilee Program; PM Narendra Modi Statement On CBI Action | PM Modi

निर्देश:PM मोदी CBI ला म्हणाले - एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडू नका, कारवाई होणारे खूप ताकदवान, पण कर्तव्यावरून लक्ष ढळू देऊ नका

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सीबीआयला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित हीरक महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी आपल्या 25 मिनिटांच्या भाषणात त्यांनी CBI चा 6 दशकांचा प्रवास व भविष्यातील आव्हानांवर उहापोह केला.

ते CBI ला म्हणाले की, 'तुम्हाला कुठेही थांबण्याची गरज नाही. तुम्ही ज्यांच्यावर कारवाई करत आहात, ते खूप ताकदवान लोक असल्याचे मला माहिती आहे. ते लोक वर्षानुवर्षे सरकार व व्यवस्थेचे घटक होते. आजही ते विविध राज्यांच्या सत्तेत सहभागी आहेत. पण तुम्हाला आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. एकही भ्रष्टाचारी वाचता कामा नये.'

पंतप्रधानांनी यावेळी शिलाँग, पुणे व नागपुरातील CBI च्या नव्या शाखा कार्यालयाच्या इमारतीचेही उद्घाटन केले.
पंतप्रधानांनी यावेळी शिलाँग, पुणे व नागपुरातील CBI च्या नव्या शाखा कार्यालयाच्या इमारतीचेही उद्घाटन केले.

येथे वाचा CBI विषयीच्या पीएम मोदींच्या 6 मोठ्या मोठ्या गोष्टी...

1. 6 दशकांत CBI ची कक्षा रुंदावली

पीए म्हणाले की, देशाची प्रीमियम इन्व्हेस्टिगेशन एजंसी म्हणून CBI ने 60 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या 6 दशकांत CBI ने बहुआयामी (Multi Dimensional) व अत्यंत शिस्तप्रिय (Multi Disciplinary) तपास यंत्रणा म्हणून आपली ओळख निर्माण केली. महानगरांपासून जंगलांपर्यंत CBI धावावे लागत आहे.

2. CBI म्हणजे न्यायाचा ब्रँड

पंतप्रधान म्हणाले, सीबीआयने आपल्या कामातून लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. लोक आपली प्रकरणे इतर एजन्सींकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करतात. न्यायाचा ब्रँड म्हणून सीबीआयचे नाव प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

पीएम मोदींनी यावेळी CBI च्या बेस्ट इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स व प्रेझिडेंट पोलिस मेडलसाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांचाही सन्मान केला.
पीएम मोदींनी यावेळी CBI च्या बेस्ट इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स व प्रेझिडेंट पोलिस मेडलसाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांचाही सन्मान केला.

3. भ्रष्टाचार सामान्य गुन्हा नाही, त्यावर अंकुश लावण्याची मोठी जबाबदारी

पीएम म्हणाले - देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची सीबीआयची मुख्य जबाबदारी आहे. भ्रष्टाचार सामान्य गुन्हा नाही. भ्रष्टाचार गरिबांचे हक्क हिरावून घेतो. अनेक गुन्ह्यांना जन्म देतो. लोकशाही व न्यायाच्या मार्गातील भ्रष्टाचार हा सर्वात मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचार असेल तिथे तरुणांना योग्य संधी मिळत नाही. तिथे केवळ एक विशिष्ट इकोसिस्टम भरभराटीला येते. भ्रष्टाचार हा प्रतिभेचा सर्वात मोठा शत्रू असतो. येथूनच घराणेशाही व कुटुंबवादाला बळ मिळते.

4. 2014 पूर्वी एका फोनवर अनेकांना कोट्यवधींचे कर्ज मिळत होते

मोदी म्हणाले - भ्रष्टाचाराने आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया असणारी बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त झाली. गत काही वर्षांत सरकारने आपल्या बँकिंग क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेत. आज आपण इंटरनेट बँकिंगबद्दल बोलतो. UPI द्वारे झालेल्या विक्रमी व्यवहारांवर चर्चा करतो. आपण 2014 पूर्वीचा बँकिंगचा काळही पाहिला आहे. तेव्हा दिल्लीतील प्रभावशाली राजकीय पक्षांशी संबंधित लोकांच्या एका फोनवर हजारो कोटींची कर्जे मिळत होती.

पीएम मोदींसोबत यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालही उपस्थित होते.
पीएम मोदींसोबत यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालही उपस्थित होते.

5. भ्रष्टांकडून सुरू होती सरकारी योजनाच्या लाभार्थ्यांची लूट

मोदी म्हणाले की, गत अनेक दशकांपासून भ्रष्टाचाऱ्यांनी देशाची तिजोरी लुटण्याचा एक नवा मार्ग शोधला होता. हे लोक सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची लूट करत होते. पण आज जनधन, आधार व मोबाईलच्या त्रिसुत्रीमुळे प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा पूर्ण हक्क मिळत आहे. भारताची आर्थिक ताकद वाढत आहे तशी अडथळे निर्माण करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. भारताच्या सामाजिक जडणघडणीवर, आपल्या एकता व बंधुत्वावर, आपल्या आर्थिक हितसंबंधांवर व आपल्या संस्थांवरील हल्ल्यांत वाढ होत आहे. साहजिकच याकामी भ्रष्टाचाराचाच पैसा वापरला जातो.

6. भ्रष्टाचाराविरोधी संघर्षात राजकीय इच्छाशक्ती मजबूत

पीएम मोदी म्हणाले की, आज देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढण्याच्या राजकीय इच्छाशक्तीचा कोणताही अभाव नाही. त्यामुळे CBI ने कोणताही विचार करण्याची गरज नाही. आपल्याला गुन्हा व भ्रष्टाचाराच्या मल्टी नेचर समजून त्याच्या मुळावर घाव घालावा लागेल.

CBI चे संचालक सुबोध कुमार जायस्वाल यांनी यावेळी पीएम मोदींना एक स्मृतीचिन्ह भेट दिले.
CBI चे संचालक सुबोध कुमार जायस्वाल यांनी यावेळी पीएम मोदींना एक स्मृतीचिन्ह भेट दिले.