आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हैसूरला पोहोचले. टोपी, टी-शर्ट आणि ट्राउझर्स परिधान केल्याने पीएम मोदींचा लूक आज हटके दिसला. बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात ते ओपन जीपमधून फिरले. पंतप्रधान तामिळनाडूच्या सीमेला लागून असलेल्या मुदुमलाई नॅशनल पार्कला भेट देतील आणि थेप्पाकडू एलिफंट कॅम्पलाही भेट दिली.
प्रोजेक्ट टायगर अंतर्गत वाघांची संख्या 3137 वर पोहोचली- PM मोदी
म्हैसूरमध्ये 'प्रोजेक्ट टायगर'ला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी वाघांशी संबंधित नवीनतम आकडेवारी जाहीर केली आणि एका मेगा इव्हेंटमध्ये एक नाणे देखील जारी केले. त्यांनी सांगितले की, 2022 पर्यंत देशातील वाघांची संख्या 2,967 वरून 3,137 पर्यंत वाढली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी अमृत काल दरम्यान वाघांना वाचवण्यासाठी सरकार आणि इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स (IBCA) चे व्हिजन लाँच केले.
बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख कर्मचाऱ्यांशी संवाद साधला
पंतप्रधान मोदी चामराजनगर जिल्ह्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेटीसाठी गेले आहेत. जिथे ते सकाळी वाघांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या फ्रंट व क्षेत्रीय कर्मचारी आणि बचत गटांशी संवाद साधला. मोदी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांचीही भेट घेतली. यानंतर पंतप्रधान मुदुमलाई नॅशनल पार्कमधील थेप्पाकडू एलिफंट कॅम्पलाही भेट दिली. माहूत आणि 'कवड्यां'शी संवाद साधला.. 'द एलिफंट व्हिस्पर्स' या ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंट्रीचे चित्रीकरण याच ठिकाणी झाले आहे.
2019 मध्ये जागतिक नेत्यांसोबत घेतला पुढाकार
2019 मध्ये, पंतप्रधान मोदींनी जागतिक नेत्यांसह आशियातील प्राण्यांची शिकार आणि अवैध व्यापार रोखण्यासाठी पुढाकार घेतला. पंतप्रधानांचा हाच संदेश पुढे नेण्यासाठी आयबीसीए सुरू करण्यात येत आहे.
वाघांची संख्या 9 वरून 53 पर्यंत वाढली, शिकारीचा धोका झाला कमी
वनविभागाचे अतिरिक्त संचालक एस.पी.यादव म्हणाले की, उत्तम तंत्रज्ञान आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे वाघांची शिकार मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. पण तरीही त्यांच्यासाठी अनेक धोके आहेत. स्थापनेच्या वेळी, 18,278 चौरस किमीमध्ये पसरलेल्या अभयारण्यात 9 वाघ होते.
आता 75,000 चौरस किमी (जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 2.4% आहे) मध्ये पसरलेले, राखीव 53 वाघ झाले आहेत. भारतामध्ये सुमारे 3,000 वाघ आहेत, जे जगातील वन्य वाघांच्या 70% पेक्षा जास्त आहेत आणि ही संख्या वर्षाला सहा टक्के दराने वाढत आहे.
जेव्हा पीएम मोदींनी टायगरचा फोटो केला क्लिक...
1 नोव्हेंबर 2016 रोजी पीएम मोदी छत्तीसगड स्थापना दिनानिमित्त नवीन रायपूर येथे गेले होते. येथे त्यांनी नंदनवन या आशियातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित जंगल सफारीचे उद्घाटन केले. सफारीला गेल्यावर त्यांनी स्वत: कॅमेरा हाताळला आणि वाघाचा फोटोही क्लिक केला. दरम्यान, सीएम रमण सिंह यांनी मोदींचा फोटो क्लिक केला होता, जो व्हायरल झाला होता.
हे ही वाचा सविस्तर
दिव्य मराठी एक्सप्लेनर - भारताला 70 वर्षांनंतर मिळणार चित्ते:ताशी 120 किमी वेग, मिनिटात करतात शिकार; फक्त 5% बछडे जगतात
दिव्य मराठी एक्सप्लायनरमध्ये आम्ही चित्त्यांना हा वेग कसा मिळतो, या वेगासाठी त्यांना किती मोठी किंमत मोजावी लागते... ही सर्व माहिती तुम्हाला सांगत आहोत. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.