आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Attends Surprise Session With CBSE Students, Discusses Concerns Related To Class 12 Exam

नवी दिल्ली:‘12वी परीक्षा रद्द झाल्याने निराश झालात?’ मोदींच्या या प्रश्नावर दहावीचा टॉपर म्हणाला : नाही, टॉपर्स नेहमी अव्वलच राहतात

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हीसीद्वारे सुरू असलेल्या चर्चेत अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का

नेहमीप्रमाणे सर्वांना चकित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी अचानक मुलांच्या संवादात सहभागी झाले. त्याचे आयोजन सीबीएसईने केले होते. दहावीत टॉप करणाऱ्या विद्यार्थ्याला पंतप्रधान मोदींनी विचारले, ‘बारावीची परीक्षा रद्द केल्याने तुम्ही निराश असाल. बारावीतही टॉपच येशील, असं कुटुंबीय म्हणत असतील. पण सगळंच हुकलं.’ विद्यार्थीही हजरजबाबी होता. तो मोदींना म्हणाला, “मेहनत करणाऱ्यांचे ज्ञान वाया जात नाही. टॉपर्स निराश नाहीत, ते नेहमी अव्वलच राहतील.’

महिला म्हणाली, शाहरुखला भेटूनही इतका आनंद झाला नाही
संवादात एका महिला पालक म्हणाली, अभिनेता शाहरुख खानला भेटूनही इतका आनंद झाला नव्हता, जेवढा तुम्हाला भेटून झाला. त्यावर माेदींनी स्मितहास्य केले. नंतर ते विद्यार्थ्यांना म्हणाले, तुम्ही माझ्याशी बोलताना अडखळला नाहीत. तुम्ही जसे आई-वडील वा शिक्षकांशी बोलता तसेच माझ्याशी बोललात. याचा आनंदच आहे.

परीक्षा होणार नाही हे माहीत होते : विद्यार्थी; भविष्य समजते का : मोदी
तामिळनाडूचा विद्यार्थी चित्रकद म्हणाला, परीक्षा होणार नसल्याचे माहीत असल्याने अभ्यास कमीच केला. मोदी म्हणाले, तुम्हाला भविष्य पाहता येते का? विद्यार्थी उत्तरला, नाही, अंदाज लावला. त्यावर मोदी म्हणाले, मग तुम्हाला कुटुंबीयांची बोलणी खावी लागतील. एकीने सांगितले की, निर्णय झाल्यानंतर मी दुपारी १२ पर्यंत झोप काढली!

मोदींनी कोरोनाबाबत मुलांची जागरूकतेची घेतली परीक्षा
यादरम्यान मोदींनी कोरोनाबाबत मुलांत किती जागरूकता आहे, हेही जोखण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘काही लोक स्वत:ला पहिलवान समजतात. मास्कची गरज नाही, असे म्हणतात.’ त्यावर अनेक मुले म्हणाली, ‘अशा गोष्टी ऐकून वाईट वाटते. सरकार तसेच अनेक लोक कोरोना प्रोटोकॉलबाबत जागरूकता करत आहेत.’

मोदींचा संदेश- कठीण काळात जे शिकलो, ते लक्षात ठेवा...
{वारंवार कठीण काळ आठवून रडू नका. या काळात जे शिकलात, ते स्मरणात ठेवा. {स्वप्नपूर्तीचा ध्यास ठेवा. आई-वडिलांना अभिमान वाटेल. {अॉलिम्पिकपटूंच्या मेहनतीबाबत माहिती घ्या, प्रेरणा मिळेल.

बातम्या आणखी आहेत...