आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Central Vista Avenue Inuguration Updates । Kartavya Path Latest News । New Parliament House Photos

कर्तव्य पथाचे उद्घाटन:नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारावर देश चालला नाही हे दुर्दैव; अन्यथा आपण समृद्ध असतो - पीएम मोदी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे असे पहिले स्वातंत्र्यसेनानी होते की, स्वातंत्र्याआधीच (1937) त्यांनी अंदमान निकोबार येथे झेंडा लावला. त्यांची विदवत्ता एवढी होती की, ते जागतिक नेते होते. त्यांच्यात प्रचंड क्षमता होती. नेताजी सुभाषचंद्र बोस भारताला आधुनिक बनवण्याचे स्वप्न होते. भारत सुभाषचंद्र बोस यांच्या विचारावर चालला असता तर देश आज जगात पहिल्या क्रमांकावर असता. परंतु त्यांच्या विचारांकडे दुर्लक्षित केले गेले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

​​​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटसमोरील सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूचे रात्री उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. रात्री ठीक 7 वाजता पंतप्रधान कर्तव्य मार्गावर पोहोचले आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे त्यांनी अनावरण केले. हा कार्यक्रम 90 मिनिटे चालणार आहे. 19 महिन्यांच्या अखंड कामगिरीनंतर सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू तयार झाला आहे.

सशक्त भारताची प्राणप्रतिष्ठा

पंतप्रधान मोदी म्हणाले, गुलामीची ओळख पुसल्याबद्दल मी शुभेच्छा देतो. आपले राष्ट्रनायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुतळा उभारला आहे. आपण नेताजींचा पुतळा उभारण्यासोबतच आधुनिक आणि सशक्त भारताची प्राणप्रतिष्ठाही करीत आहोत. आपले हे सौभाग्य आहे की, आपण आजचा दिवस पाहत आहोत. सुभाषचंद्र बोस हे आव्हानाशी भिडणारे होते. भारतचा गौरवमय इतिहास प्रत्येक भारतीयांत आणि परंपरेत आहे.

नेताजींच्या पुतळ्यामुळे प्रेरणा

पंतप्रधान मोदी म्हणाले, सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची उभारणी हा अभुतपुर्व क्षण आहे. गुलामीची ओळख आता आपण मिटवली आहे. गुलामीच्या मानसिकतेचा आपण त्याग केला आहे. नेताजींच्या पुतळ्यामुळे प्रेरणा मिळणार आहे.

उद्घाटनाच्या आदल्या दिवसांपर्यंत सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूवर काम सुरूच होते. एका पर्यवेक्षकाने सांगितले की काम लवकर पूर्ण करायचे होते. त्यामुळे मजूर 24 तास काम करीत होते. 9 सप्टेंबरपासून लोकांना येथे प्रवेश करता येणार आहे.

लाईव्ह अपडेट्स

सेंट्रल व्हिस्टाच्या आजपर्यंतच्या इतिहासावर एक प्रदर्शन लावण्यात आले आहे, ते पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
सेंट्रल व्हिस्टाच्या आजपर्यंतच्या इतिहासावर एक प्रदर्शन लावण्यात आले आहे, ते पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

अपडेट्स ः 7.25 वाजता पीएम मोदी यांनी सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू ज्यांच्या परिश्रमाने उभा राहीला अशा कामगारांशी संवाद साधला.

अपडेट्स 7 वाजता ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन केले.

या सर्व कामगारांनी सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू बनवण्याचे काम केले. PM मोदींनी त्यांना 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.
या सर्व कामगारांनी सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू बनवण्याचे काम केले. PM मोदींनी त्यांना 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हा पुर्णाकृती पुतळा 28 फूट उंच आहे. पुतळा बनवण्यासाठी 26 हजार तास लागले. 23 जानेवारी रोजी पराक्रम दिनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्राम पुतळा ज्या ठिकाणी दाखवण्यात आला होता. त्याच ठिकाणी आज गुरूवारी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

दिल्ली उच्च न्यायालय दुपारी 3 वाजेपासून बंद राहणार

सेंट्रल व्हिस्टाच्या उद्घाटनामुळे गुरुवारी दुपारी 3 वाजेपासून दिल्ली उच्च न्यायालय तसेच पतियाळा हाऊस न्यायालय बंद राहणार आहे. बुधवारी उच्च न्यायालयाने अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजी तैनात

पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने (एसपीजी) ताब्यात घेतली. उद्घाटनापूर्वी बाहेरील व्यक्तीला या परिसरात प्रवेश दिला जात नाहीये. केंद्रीय दलाशिवाय खासगी सुरक्षा रक्षकही लक्ष ठेवून आहेत. येथे फोटो काढण्यासही मनाई आहे. कडेकोट बंदोबस्तामुळे पर्यटक बॅरिकेड्सजवळ उभे राहून इंडिया गेट पाहण्याचा प्रयत्न करत राहिले.

खाद्यपदार्थ विकणाऱ्या एका विक्रेत्याने सांगितले की, तीन वर्षे अत्यंत कठीण काळात गेली आहेत. परिसरात सर्वत्र काम सुरू होते. आता ते खूप सुंदर झाले आहे. आशा आहे की आणखी लोक येथे येतील आणि आमचा व्यवसाय चांगला चालेल.

सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा उद्घाटन कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता सुरू होईल, 90 मिनिटे चालेल. त्यासाठी आजूबाजूचे रस्ते सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. जाणून घ्या पंतप्रधान मोदींचा मिनिटा-मिनिटाचा कार्यक्रम...

7:00 PM - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण 7:10 PM - इंडिया गेटला पोहोचतील पीएम 7:25 PM - कामगारांशी संवाद 7:30 PM - कर्तव्यपथाचे उद्घाटन 7:40 PM - स्टेजवर पोहोचतील पीएम 8:02 PM - पंतप्रधान मोदींचे भाषण

20 हजार कोटींचा प्रकल्प

सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत 3.2 किमी पसरलेला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याची रचना डॉ. बिमल पटेल यांनी केली आहे. लाल ग्रॅनाइटपासून बनवलेल्या 15.5 किमीच्या पायवाटेपासून ते 16 पूल आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सपर्यंतची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. सुमारे 20 महिन्यांनंतर ते सर्वसामान्यांसाठी खुले केले जाईल.

उद्घाटनाच्या आदल्या दिवसापर्यंत सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूवर काम सुरूच होते. एका पर्यवेक्षकाने सांगितले की बुधवारी रात्रीपर्यंत काम पूर्ण करायचे आहे, त्यामुळे मजूर 24 तास कार्यरत आहेत. ९ सप्टेंबरपासून लोकांना येथे फिरता येणार आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला शॉप, राज्यांचे फूड स्टॉल

व्हिस्टा म्हणजे मनमोहक दृश्य. राजपथाच्या आजूबाजूचा राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंतचा परिसर हिरवीगार झाडे, कालवे आणि उद्यानांनी वेढलेला आहे. पूर्वी ते सुंदर होते, आता ते अधिक आकर्षक झाले आहे.

इंडिया गेटच्या दोन्ही बाजूंना नवीन दुकाने बांधण्यात आली असून त्यामध्ये विविध राज्यांच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील. पर्यटकांना हिरवळीवर बसून पूर्वीसारखे घरून आणलेले अन्न खाणे शक्य होणार नाही. याशिवाय विक्रेते केवळ विशिष्ट झोनमध्ये स्टॉल लावू शकतील. दोन नवीन पार्किंगमध्ये 1100 हून अधिक वाहने पार्क करता येतील. पाळत ठेवण्यासाठी 300 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

डिसेंबर 2020 मध्ये पंतप्रधान मोदींनी केली होती पायाभरणी

अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे, जो मोदी सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास योजनेअंतर्गत पूर्ण झाला आहे. सेंट्रल व्हिस्टा योजना सप्टेंबर 2019 मध्ये जाहीर करण्यात आली होती. त्याची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी केली. मात्र, येथील काही इमारतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापैकी राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, वॉर मेमोरियल, हैदराबाद हाऊस, रेल भवन, वायु भवन हे पुनर्विकास प्रकल्पाचा भाग नाहीत.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातही या विकासाचाही समावेश

  • नवीन त्रिकोणी संसद भवन
  • सामान्य केंद्रीय सचिवालय (सचिवालय)
  • तीन किलोमीटरच्या राजपथाची सुधारणा
  • पंतप्रधानांचे नवे निवासस्थान
  • नवीन पंतप्रधान कार्यालय
  • नवीन उपराष्ट्रपती एन्क्लेव्ह

भूखंड क्रमांक 118 वर नवीन त्रिकोणी संसद भवन तयार केले जात आहे. संपूर्ण प्रकल्प 64,500 चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे. संसदेची विद्यमान इमारत 16,844 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेली आहे. संसदेची नवीन इमारत 20,866 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेली आहे. म्हणजेच जुन्या इमारतीपेक्षा सुमारे 4 हजार चौरस मीटर मोठी आहे. यामध्ये खासदारांसाठी लाउंज, महिलांसाठी लाउंज, लायब्ररी, जेवणाचे क्षेत्र असे अनेक कप्पे असतील.

फोटोंमध्ये आधी आणि आता सेंट्रल व्हिस्टा पाहा...

इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या राजपथाच्या दोन्ही बाजूंच्या भागाला सेंट्रल व्हिस्टा म्हणतात.
इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या राजपथाच्या दोन्ही बाजूंच्या भागाला सेंट्रल व्हिस्टा म्हणतात.
विजय चौक ते इंडिया गेट हा 3 किमी लांबीचा राजपथ अनेक सुविधांनी तयार करण्यात आला आहे.
विजय चौक ते इंडिया गेट हा 3 किमी लांबीचा राजपथ अनेक सुविधांनी तयार करण्यात आला आहे.
रेड-ग्रॅनाईट वॉकवे जो 1.1 लाख चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे आणि सर्वत्र हिरवळ आहे.
रेड-ग्रॅनाईट वॉकवे जो 1.1 लाख चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे आणि सर्वत्र हिरवळ आहे.
नव्याने उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि पार्किंगमध्ये चोवीस तास सुरक्षा असेल.
नव्याने उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि पार्किंगमध्ये चोवीस तास सुरक्षा असेल.
कालव्याची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून पादचाऱ्यांसाठी 16 पूलही बांधण्यात आले आहेत. येथे बोटिंगदेखील करता येते.
कालव्याची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून पादचाऱ्यांसाठी 16 पूलही बांधण्यात आले आहेत. येथे बोटिंगदेखील करता येते.
या ठिकाणी 133 हून अधिक लाइट पोल बसवण्यात आले आहेत. मार्गावरील पार्किंग एक किंवा दोन महिन्यांसाठी विनामूल्य असेल.
या ठिकाणी 133 हून अधिक लाइट पोल बसवण्यात आले आहेत. मार्गावरील पार्किंग एक किंवा दोन महिन्यांसाठी विनामूल्य असेल.
कालव्याची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून पादचाऱ्यांसाठी 16 पूलही बांधण्यात आले आहेत. येथे बोटिंग देखील करता येते.
कालव्याची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून पादचाऱ्यांसाठी 16 पूलही बांधण्यात आले आहेत. येथे बोटिंग देखील करता येते.
पदपथाच्या बाजूला असलेले दगड आणि साखळ्याही बदलण्यात आल्या आहेत. 1,125 कार आणि 40 बसेस पार्क केल्या जाऊ शकतात.
पदपथाच्या बाजूला असलेले दगड आणि साखळ्याही बदलण्यात आल्या आहेत. 1,125 कार आणि 40 बसेस पार्क केल्या जाऊ शकतात.
लोकांना चालण्यासाठी 16.5 किमीचा मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर लाल ग्रॅनाइट बसविण्यात आले आहे.
लोकांना चालण्यासाठी 16.5 किमीचा मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर लाल ग्रॅनाइट बसविण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...