आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Modi Chaired Meeting | Review Oxygen Supply | Across The Country News And Update, Exemption From Basic Customs Duty & Health Cess On Import Of Items Related To Oxygen & Oxygen Related Equipment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर मोदी अ‍ॅक्शन मोडमध्ये:ऑक्सिजनसंबंधीत वस्तू आणि उपकरणांवर पुढचे 3 महिने कस्टम ड्यूटी नाही, लसीच्या आयातीवरही सूट

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी उच्चस्तरीय आढावा बैठकही घेण्यात आली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी घेतलेल्या पावलांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याबरोबरच, घरी आणि रुग्णालयात रूग्णांच्या काळजीसाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याची तातडीने गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

ऑक्सिजन व वैद्यकीय पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व मंत्रालये व विभागांनी समन्वयाने काम करण्यावर त्यांनी भर दिला. ऑक्सिजन संबंधित उपकरणांच्या आयातीवर 3 महिन्यांपर्यंत मूलभूत सीमाशुल्क आणि आरोग्य उपकर लावला जाणार नाही, असा निर्णयही घेण्यात आला.

पंतप्रधानांनी महसूल विभागाला अशा उपकरणांच्या आयातीबाबत लवकरात लवकर मंजुरी देण्याचे निर्देश दिले. कोरोना लसींच्या आयातीवरील मूलभूत कस्टम शुल्क 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल, असा निर्णयही घेण्यात आला.

गुरुवारी उच्चस्तरीय आढावा बैठकही घेण्यात आली
त्याआधी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली होती. यात त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात कोणताही अडथळा येऊ नये.

गृह मंत्रालयाने राज्यांना निर्देश दिले - ऑक्सिजन असणाऱ्या गाड्यांची वाहतूक अडवू नये

  • एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात ऑक्सिजन नेणारी वाहने थांबवली जाणार नाहीत.
  • एका राज्यातून दुसर्‍या राज्यात ऑक्सिजन नेणार्‍या वाहनांना कोणतेही बंधन असणार नाही.
  • ऑक्सिजन उत्पादकांना त्यांचा पुरवठा कोणत्याही एका राज्यात किंवा शहरातील रुग्णालयात पाठवण्यास सांगता येणार नाही.
  • शहरांमध्येही ऑक्सिजन असणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधने येणार नाहीत.
बातम्या आणखी आहेत...