आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Modi Congratulates US President Joe Biden, Says Two Countries United In Addressing Common Challenges

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींच्या बायडेन-हॅरिस यांना शुभेच्छा:PM म्हणाले - 'जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी मिळून काम करु, देशांतील संबंधांना नवीन उंचीवर घेऊन जाऊ'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी एकत्र काम करुन दोन्ही देश आपल्या संबंधांना नवीन उंचीवर घेऊन जातील.

जो बायडेन हे बुधवारी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले. तर कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बायडेन आणि हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही देश कॉमन चॅलेंजसाठी मिळून काम ककरतील. जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी एकत्र काम करुन दोन्ही देश आपल्या संबंधांना नवीन उंचीवर घेऊन जातील.

भारत-अमेरिकेची भागिदारी मूल्यांवर आधारित
मोदींनी बायडेन यांना शुभेच्छा देताना लिहिले की, 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. तुमच्यासोबत काम करण्यासाठी उत्साहित आहे. मी तुमच्या यशस्वी कार्यकाळासाठी प्रार्थना करतो.'

मोदी म्हणाले की, 'भारत अमेरिकेची भागिदारी मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव आणि बहुपक्षीय द्विपक्षीय अजेंडा आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील रणनीतिक भागीदारी बळकट करण्यासाठी मी तुमच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे.'

तसेच कमला हॅरिस यांचे अभिनंदन केले
हा ऐतिहासिक क्षण होता असे सांगत मोदींनी उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस यांचे अभिनंदन केले. तुमच्याबरोबर आम्ही दोन्ही देशांचे संबंध दृढ करू. जगासाठी दोन्ही देशांची भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे.

बुधवारी रात्री दोघांनी शपथ घेतली
जोसेफ आर बायडेन जूनियर म्हणजेच जो बायडेन बुधवारी रात्री अमेरिकन इतिहासातील सर्वात वयस्कर अध्यक्ष झाले. ते 78 वर्षांचे आहेत. कमलादेवी हॅरिस यांनीही उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. 56 वर्षाच्या कमला हॅरिस यांनी इतिहास रचला. त्या पहिल्या महिला, अश्वेत आणि भारतवंशी उपराष्ट्राध्यक्ष आहेत.

बातम्या आणखी आहेत...