आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Cylinder Poster Controversy I Latest News And Update I TRS Leader On Nirmala Sitharaman I

अर्थमंत्र्यांच्या प्रश्नावर टीआरएसचे प्रत्युत्तर:सिलिंडरवर लावला PM मोदींचा फोटो; सीतारामन म्हणाल्या होत्या- रेशन दुकानांत PM चा फोटो का नाही

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रश्नाला तेलंगणा राष्ट्र समितीने (TRS) जोरदार उत्तर दिले आहे. टीआरएसच्या वतीने एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, सिलिंडरवर त्याची किंमत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आली आहे. टीआरएस सीतारामन यांच्या व्यक्तव्यानंतर चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तर तेलंगाणाचे आरोग्य मंत्री राव यांनी तर केंद्रीय अर्थमंत्र्यांचा दावा फेटाळून लावला आहे.

यासोबतच राज्याचे आरोग्यमंत्री टी. हरीशराव यांनीही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, निर्मला सीतारामन यांनी रेशन दुकानांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यास सांगितले आहे. पंतप्रधानांचा फोटो रेशन दुकानात लावण्याची वेळी आल्याने पंतप्रधानांची पातळी इतकी खाली आहे का ?

तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये काही एलपीजी सिलिंडरवर पंतप्रधान मोदींचा फोटो चिकटवण्यात आला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे –मोदी जी – 1105 रुपये. असा उल्लेख कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी, तुम्हाला पीएम मोदींचा फोटो हवा असेल तर घ्या. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे पुत्र राज्यमंत्री के. टी. रामाराव यांनीही या प्रकरणी निवेदन जारी केले आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अशा वर्तनाने मला धक्का बसल्याचे ते म्हटले आहे.

आरोग्यमंत्री राव यांनी अर्थमंत्र्यांची खिल्ली उडवली
आरोग्यमंत्री टी. हरीश राव यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची खिल्ली उडवत केंद्र सरकार राज्याला मोफत तांदूळ देत असल्यासारखे बोलत आहे. तेलंगणा राज्य हे 5 ते 6 राज्यांपैकी एक आहे. जे आपल्या देशाची आर्थिक काळजी घेण्यास मदत करते. मग काय तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो तेलगंणासह अन्य राज्यात लावायचा का ? दरम्यान, मंत्री राव यांनी बीरकुरमधील कामारेड्डीच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत सीतारामन रागावून बोलत असल्याच्या व्हायरल व्हिडिओवरही प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांना खडसावले
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या शुक्रवारी तेलगांना राज्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी जितेश पाटील यांना स्वस्त धान्य दुकानांतून पुरवल्या जाणाऱ्या तांदूळाबाबत केंद्र व राज्याचा वाटा किती आहे. असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी त्यांना उत्तर देता न आल्याने सीतारामन यांनी खडसावले. त्या म्हणाल्या की, येथे जो तांदूळ 35 रुपये दराने विकला जात आहे. यामध्ये केंद्राकडून 30 रुपये, तर राज्याकडून 4 रुपये दिले जातात. त्याचवेळी लाभार्थ्यांकडून 1 रुपये घेतले जातात.​

पुढे बोलताना अर्थमंत्री सीतारामन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारले की, तेलंगणातील रेशन दुकानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे का गायब आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, आमचे लोक येतील आणि पंतप्रधानांचे फोटो लावतील. तुम्ही ते हटणार नाही, याची काळजी घ्यावी.

राव यांनी अर्थमंत्र्यांचे दावे फेटाळले
मंत्री हरीश राव यांनी अर्थमंत्र्यांचे दावे फेटाळून लावले आहेत. त्यांनी मेडक जिल्ह्यातील तुपरन येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, केंद्र 50-55 टक्के योगदान देत नाही. उर्वरित 45 % साठी, राज्य 10 किलो तांदूळ मोफत देते आणि दरमहा 3,610 कोटींचा खर्च करते.

बातम्या आणखी आहेत...