आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Declares His Assets. All About Where He Has Invested His Personal Wealth

मोदींच्या संपत्तीचा हिशोब:पंतप्रधानांजवळ 2.85 कोटींची संपत्ती, एका वर्षात 36 लाखांची वाढ; त्यांच्याकडे सोन्याच्या 4 अंगठ्या आहेत; मात्र कार आणि कोणतेही कर्ज नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बचत खात्यात आहेत 3.38 लाख रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आपली संपत्ती व दायित्वे जाहीर केले आहेत. 2019 मध्ये त्यांच्याकडे 2.49 कोटींची संपत्ती होती. यावर्षी 30 जूनपर्यंत ती वाढून 2.85 कोटी रुपये झाली आहे. बँक बॅले आणि एफडीमुळे त्याच्या मालमत्तेत एका वर्षात 36 लाख रुपयांची वाढ झाली आहे.

पंतप्रधानांवर कोणतेही कर्ज नाही
70 वर्षांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणतेही कर्ज नाही. त्यांच्याजवळ 31 हजार 450 रुपये रोख रक्कम आहे. त्यांच्या बचत खात्यात 3.38 लाख रुपये आहेत. 31 मार्च 2019 ला बचत खात्यामध्ये केवळ 4,143 रुपये होते. एसीआयच्या गांधीनगर शाखेमध्ये त्यांच्या एफडीमध्ये 1 कोटी 60 लाख 28 हजार 39 रुपये राहिले आहेत. एक वर्षापूर्वी ही रक्कम एक कोटी 27 लाख 81 हजार 574 रुपये होते.

मोदी 8,43,124 रुपयांच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटच्या माध्यमातून टॅक्स सेविंग करतात. आपल्या जीवन वीमासाठी 1,50,957 चे प्रीमियम भरतात. पंतप्रधानांजवळ नॅशनल सेविंग सर्टिफिकेटचे 7,61,646 रुपये होते आणि जीवन विमा प्रीमियमच्या रुपात 1,90,347 रुपये त्यांनी भरले आहेत.

जाणून घ्या पंतप्रधानांच्या पैशांचा हिशोब
कॅशन इन हँड : 31,450 हजार रुपये
बचत खात्यात : 3.38 लाख रुपये
फिक्स्ड डिपॉजिटची व्हॅल्यू : जवळपास 1.6 कोटी रुपये
टॅक्स फ्री बांड : जवळपास 20 हजार रुपये
पोस्ट ऑफिस एनएससी : जवळपास 8.4 लाख रुपये
एलआईसी: 1.50 लाख रुपये
स्थावर मालमत्ता: गांधीनगरमध्ये 1.1 कोटींच्या बंगल्यात पीएम मोदींची 25% ची भागीदारी

फिक्स डिपॉजिटमध्ये वाढ झाली आहे
भारतीय स्टेट बँकच्या गांधीनगर शाखेमध्ये त्यांची फिक्स डिपॉजिटची रक्कम 30 जून 2020 पर्यंत वाढून 1,60,28,039 रुपये झाली आहे. जी मागच्या आर्थिक वर्षात 1,27,81,574 रुपये होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी याची घोषणा केली होती.

पीएम मोदींकडे कोणतीही कार नाही
ताज्या रिपोर्टनुसार, पीएम मोदींच्या स्थावर मालमत्तेमध्ये कोणतेही विशेष बदल झालेले नाहीत. डीटेल्सनुसार, मोदींच्या नावावर गांधीनगरमध्ये एक बंगला आहे. ज्याची किंमत 1.1 कोटी रुपये आहे. या बंगल्याचा मालकी हक्क मोदी आणि त्याच्या कुटुंबाला आहे. त्याच्याजवळ सोन्याच्या चार अंगठ्या आहेत. पीएम मोदींजवळ कोणतीही कार नाही.

2 लाख आहे मोदींची सॅलरी
मोदींची सॅलरी दोन लाख रुपये आहे. जी जागतिक पातळीपेक्षा खूपच कमी आहे. कोरोना विषाणूमुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेचा विचार करता पंतप्रधानांनी स्वतःसोबतच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, कॅबिनेट सदस्य आणि खासदारांचा पगार 30 टक्के कमी केला आहे. त्याची सुरुवात एप्रिल महिन्यात झाली. पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत झालेली वाढ ही त्यांच्या पगाराच्या बचतीमुळे आणि निश्चित ठेवीवरील व्याजातून झाली आहे. सरकारी कर्मचारी आणि मंत्री अनेकदा अशा प्रकारे आपले पैसे वाचवतात.

बातम्या आणखी आहेत...