आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान मोदी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शनिवारी हैदराबादला जाणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांचा 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' राष्ट्राला समर्पित करतील. सायंकाळी ५ वाजता कार्यक्रम सुरू होईल. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी ही अष्टधातुपासून बनलेली जगातील सर्वात मोठी मूर्ती आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या मूर्तीचा समावेश करण्यात आला आहे.
सुमारे 1000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रामानुजाचार्य मंदिरात ही मूर्ती बसवण्यात आली आहे. तत्पूर्वी, पीएम मोदी हैदराबादच्या पाटनचेरू येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉप रिसर्च (ICRIST) ला भेट देतील आणि ICRIST च्या 50 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन करतील.
संत रामानुजाचार्य स्वामींच्या जन्माला 1001 वर्षे पूर्ण
भारतात प्रथमच समतेचा संदेश देणाऱ्या वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामींच्या जन्माला 1001 वर्षे पूर्ण झाली आहेत. हैदराबादमध्ये रामानुजाचार्यांचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरात रामानुजाचार्यांच्या दोन मूर्ती आहेत. पहिली अष्टधातूची 216 फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली असून, त्याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असे नाव देण्यात आले आहे.
दुसरी मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली असून ही मूर्ती 120 किलो सोन्याची आहे. हैदराबादपासून 40 किमी अंतरावर असलेल्या रामनगरमध्ये बांधलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
सनातन परंपरेतील संतांचे पहिले भव्य मंदिर
आजवर सनातन परंपरेतील कोणत्याही संतासाठी इतके भव्य मंदिर बांधलेले नाही. रामानुजाचार्य स्वामी हे पहिले संत आहेत ज्यांची एवढी मोठी मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. मंदिराचे बांधकाम 2014 मध्ये सुरू झाले होते. रामानुजाचार्यांचा मोठा पुतळा चीनमध्ये बनवण्यात आला आहे. याची किंमत सुमारे 400 कोटी आहे. अष्टधातुपासून बनवलेली ही सर्वात मोठी मूर्ती आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मूर्तीचा समावेश करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.