आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Diwali । Prime Minister Narendra Modi Visited Naushera Camp In Jammu And Kashmir And Celebrated Diwali With The Soldiers.

सैनिकांसोबत मोदींची दिवाळी:"सैनिकच माझे कुटुंबीय, म्हणूनच दिवाळी साजरी करण्यासाठी या ठिकाणी येत असतो!" पीएम मोदींची जवानांसोबत दिवाळी, हाताने भरवली मिठाई

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसोबत आपली दिवाळी साजरी केली. मोदी आज राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये असून, येथे त्यांना सैनिकांसोबत सुमारे एक तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी स्वत: आपल्या हाताने जवानांना मिठाई खाऊ घातली.

मोदी म्हणाले की, "मी येथे प्रधानमंत्रीच्या नात्याने नव्हे तर आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नात्याने इथे आलो आहे. तुम्हाला घरी गेल्यावर कुंटुबातील सर्व सदस्यांकडे जशी आपुलकी जाणवते, अगदी तशीच आपुलकी मला येथे आल्यावर तुमच्याच जाणवत आहे."

"मी असा संकल्प केला आहे की, मी प्रत्येक दिवाळी आपल्या जवानांसोबत साजरी करणार आहे. आज भारतातील प्रत्येक नागरिक या दिवाळीच्या निमित्ताने एक दिवा पराक्रम, शौर्य, त्याग आणि तपस्या या नावाने लावून प्रकाशमय करेल"

'तुम्ही भारताची ढाल आहात'
देशाची सेवा करण्याचे जे भाग्य तुम्हाला मिळाले आहे, ते मला तुमच्य़ा चेहऱ्यावरून स्पष्टपण दिसत आहे. तुम्ही देशाच्या सुरक्षेचे कवच आहात. तुमच्यामुळे संपुर्ण देश शांतेतत राहु शकतो. तुम्ही पार पडत असलेल्या कर्तव्यामुळेच आज देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित आहेत. त्यासाठी तुमचे खूप-खूप आभार. दिवाळीनंतर गोवर्धन पूजा, छठ पूजा येणार आहे. त्यासाठी देखील तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. असे मोदी म्हणाले.

सुरक्षेत आत्मनिर्भरता येत आहे

मोदी म्हणाले की, पुर्वी असे व्हायचे की, जेव्हा गरज भासली तेव्हाच हत्यार खरेदी केले जायचे. मात्र आता सुरक्षेत आत्मनिर्भरता येत आहे. भारताने आता 200 पेक्षा जास्त हत्यार तसेच सामान देशातच तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताची सुरक्षा आणखी वाढणार आहे. जगभरात होणाऱ्या परिवर्तनासोबतच भारतात देखील मोठ्या प्रमाणात परिवर्तन आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

महिला आणखी शक्तीशाली होत आहेत

मोदी म्हणाले की, देशातील महिलांना शक्तीशाली आणि मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. नौदल आणि हवाई दलात देखील महिला शक्तीचा विस्तार होत आहे. देशातील महिलांसाठी मिलिट्रीचे दार उघडण्यात आली आहे. असे मोदी म्हणाले.

सेनेत येणे म्हणजे नोकरी करणे नाही तर कर्तव्य बजावणे हे आहे. तुम्ही देशाची सुरक्षा करत आहात आणि आपल्याला आपल्या जन्मभूमीसाठीच जगायचे आहे. भारत सुरूवातीपासूनच अमर होता आजही आहे आणि पुढेही राहणार. असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी दरवर्षी दिवाळी सणाला जवानांची साजरी करतात. काही वर्षापुर्वी त्यांनी सांगितले होती की, बॉर्डरवर असणाऱ्या जवानांमुळेच आम्ही आज चांगल्या प्रकारे सण साजरे करू शकतो. त्यामुळेच मोदी दरवर्षी जवानांमध्ये जाऊन दिवाळी साजरा करत असतात. मोदी यांनी आतापर्यंत जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...