आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Europe Visit Updates । PM Modi In Europe । Indo German Inter Governmental Consultation । Modi Denmark, France Tour

जर्मनीत रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख:मोदी म्हणाले- युद्धात कोणी जिंकणार नाही; या अनागोंदीमुळे तेल महाग झाले, अन्नधान्य व खतांचे संकट वाढले

बर्लिन19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी आपल्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जर्मनीत होते. त्यांनी जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ पातळीवरील बैठकीला हजेरी लावली. यामध्ये भारत आणि जर्मनी यांच्यात हरित ऊर्जेबाबत महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे.

जर्मनी दौऱ्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन-रशिया युद्धाबाबत काय बोलणार याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. शिष्टमंडळ स्तरावरील बैठक संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात युक्रेन-रशिया युद्धाचा उल्लेख केला. युक्रेन-रशिया युद्ध सुरु झाल्यानंतर आम्ही तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले होते, असे मोदी म्हणाले. तसेच वाद सोडवण्यासाठी संवाद हाच एकमेव मार्ग आहे, असेही त्यांनी म्हटलं. आमचा विश्वास आहे की या युद्धात कोणताही पक्ष जिंकणार नाही, सर्वांनाच त्रास होईल, त्यामुळे आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, असे त्यांनी नमूद केले.

युक्रेन-रशिया संघर्षामुळे तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या असून जगात अन्न आणि खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे जगातील प्रत्येक कुटुंबावर बोझा पडला आहे. परंतु विकसनशील आणि गरीब देशांवर त्याचा परिणाम अधिक गंभीर होत आहे, असेही मोदी म्हणाले.

भारत जागतिक सुधारणेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनेल -
इतर मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत कोविड नंतरच्या काळात भारताची सर्वात वेगवान वाढ होत आहे. भारत जागतिक सुधारणेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनेल. अलीकडेच आम्ही UAE आणि ऑस्ट्रेलियासोबत फार कमी कालावधीत व्यापार करार केले असल्याचे मोदींनी सांगितले.

माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे स्वागत केल्याबद्दल मी चान्सलर ओलाफ स्कोल्झचे आभार मानतो. या वर्षीचा माझा पहिला परदेश दौरा जर्मनीत होत आहे, याचा मला आनंद आहे. लोकशाहीवादी देश म्हणून भारत आणि जर्मनीमध्ये अनेक समान मूल्ये आहेत. या सामायिक मूल्ये आणि समान हितसंबंधांवर आधारित, आमच्या द्विपक्षीय संबंधांनी गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केल्याचे मोदींनी म्हटलं.

द्विवार्षिक आंतर-सरकारी सल्लामसलत (IGC) च्या सहाव्या फेरीत दोन्ही देशांमधील भागीदारीला नवी दिशा मिळेल. आमची शेवटची IGC 2019 मध्ये झाली तेव्हापासून, जगात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. कोविड-19 महामारीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विध्वंसक परिणाम झाला आहे. अलीकडील भू-राजकीय घटनांनी हे देखील दाखवले आहे की जागतिक शांतता आणि स्थिरता किती नाजूक आहे आणि सर्व देश एकमेकांशी कसे जोडलेले आहेत, असे मोदी म्हणाले.

भारत आणि जर्मनी दरम्यान 10.5 अब्ज डॉलरचा हरित ऊर्जा करार -
पीएम मोदी आणि जर्मन चान्सलर यांनी भारत आणि जर्मनी दरम्यान हरित ऊर्जा आणि शाश्वत ऊर्जा या विषयावर महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केली. भारत आणि जर्मनी मिळून ग्रीन हायड्रोजन टास्क फोर्स तयार करतील. युरोपियन युनियन (EU) सोबत मुक्त व्यापार करार करण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असे पीएम मोदी म्हणाले. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शाश्वत विकासावर दोन्ही देशांदरम्यान एक करार झाला आहे. ज्या अंतर्गत भारताला 2030 पर्यंत स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी $ 10.5 अब्जची आर्थिक मदत मिळणार आहे.

भारत सुपर पार्टनर -
यादरम्यान जर्मनीच्या चान्सलरने भारताला आशियातील सुपर पार्टनर असल्याचे म्हटले. जूनमध्ये होणाऱ्या G-7 बैठकीत सहभागी होण्यासाठी मोदींना जर्मनीने निमंत्रित केल्याचेही त्यांनी सांगितेल. इंडो-पॅसिफिक हा अतिशय गतिमान प्रदेश आहे. पण या प्रदेशाल आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या प्रदेशात भारत हा आपला अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे. जगाचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण हे स्पष्ट करू की जग काही बलाढ्य देशांच्या इशाऱ्यावर चालणार नाही तर भविष्यातील संबंधांवरच चालणार आहे, असे जर्मन चान्सलर स्कोल्झ म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी बर्लिनमध्ये चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींनी बर्लिनमध्ये चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली.

यादरम्यान, भारत आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये डायरेक्ट एनक्रिप्टेड कनेक्शन स्थापित करण्यासाठीचा करार करण्यात आला आहे. या करारावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अॅनालेना बर्बॉक यांच्या भेटीदरम्यान स्वाक्षरी करण्यात आली. जयशंकर यांनी स्वतः ही माहिती दिली.

फेडरल चॅन्सेलरी येथे पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
फेडरल चॅन्सेलरी येथे पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, पीएम मोदी आणि चांसलर ओलाफ स्कोल्झ वन-टू-वन बैठकीनंतर द्विपक्षीय चर्चा करतील. डिसेंबर 2021 मध्ये स्कोल्झ कुलपती झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रप्रमुखांमधील ही दुसरी बैठक आहे. याला आपापसात धोरणात्मक भागीदारी राखण्यासाठी आवश्यक असलेली हाय मोव्हमेंट एक्सचेंज म्हणून पाहिले जाऊ शकते.

बर्लिनमधील ऐतिहासिक ब्रँडनबर्ग गेटवर भारतीय संस्कृतीचे रंग पाहायला मिळाले.
बर्लिनमधील ऐतिहासिक ब्रँडनबर्ग गेटवर भारतीय संस्कृतीचे रंग पाहायला मिळाले.

यानंतर 3 मे रोजी ते इंडो-नॉर्डिक परिषदेत सहभागी होतील आणि त्यानंतर डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये भारतीयांना संबोधित करतील. अखेरीस पंतप्रधान मोदी पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत.

बर्लिनला पोहोचताच पंतप्रधान मोदींनी ट्विट केले होते. त्यांनी लिहिले की, ते कुलपती ओलाफ स्कोल्झ यांच्याशी बोलतील. याशिवाय ते व्यावसायिक नेत्यांचीही भेट घेतील आणि एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित करतील. या भेटीमुळे भारत आणि जर्मनी यांच्यातील मैत्रीला बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पीएमओकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात पंतप्रधानांच्या या भेटीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आज सर्वप्रथम जर्मनीची राजधानी बर्लिनला पोहोचणार. येथे ते जर्मन चान्सेलर ओलाफ स्कोल्झ यांच्यासह 6व्या भारत-जर्मनी इंटर-गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन (IGC) मध्ये सहभागी होतील.

पंतप्रधान मोदी आज जर्मनीचे चान्सेलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतील आणि अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील.
पंतप्रधान मोदी आज जर्मनीचे चान्सेलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतील आणि अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील.

पीएम मोदींच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, भारत-जर्मनी राजनैतिक संबंधांना 2021 मध्ये 70 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आम्ही 2000 सालापासून धोरणात्मक भागीदारही आहोत. मी चान्सेलर स्कोल्झ यांच्यासोबत धोरणात्मक, प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करेन. जर्मन चान्सेलर आणि मी आमच्या उद्योग सहकार्यासाठी एका व्यावसायिक गोलमेज बैठकीला संबोधित करू.

युरोप खंडात भारतीय वंशाचे दहा लाखांहून अधिक लोक राहतात. त्यापैकी मोठ्या संख्येने जर्मनीमध्ये राहतात. पंतप्रधान मोदी येथे भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करणार आहेत.

डेन्मार्कमधील नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार

त्यानंतर 3 मे रोजी पंतप्रधान मोदी डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनला पोहोचतील. येथे ते 3 आणि 4 मे रोजी पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्यासोबत द्विपक्षीय कार्यक्रम आणि दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. यासोबतच आर्थिक सुधारणा, हवामान बदल आणि अक्षय्य ऊर्जा या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदी आणखी चार नॉर्डिक देशांच्या नेत्यांना भेटतील. नॉर्डिक प्रदेशात डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड, नॉर्वे आणि स्वीडन यांचा समावेश आहे.

3 आणि 4 मे रोजी पंतप्रधान मोदी डेन्मार्कच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येथे होणाऱ्या दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहे.
3 आणि 4 मे रोजी पंतप्रधान मोदी डेन्मार्कच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येथे होणाऱ्या दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहे.

नॉर्डिक देश भारतासाठी शाश्वत आणि अक्षय ऊर्जा, डिजिटायझेशन आणि इनोव्हेशनमध्ये महत्त्वाचे भागीदार आहेत. या भेटीमुळे नॉर्डिक देशांसोबत बहुआयामी सहकार्य वाढण्यास मदत होईल.

विजयाबद्दल इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे अभिनंदन

परतीच्या वेळी पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील आणि पुन्हा निवडणूक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतील. यासोबतच भारत-फ्रान्स स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या पुढील टप्प्याबाबत चर्चा करतील. पंतप्रधान म्हणतात की, माझा युरोप दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा हा प्रदेश अनेक आव्हानांना तोंड देत आहे. या भेटीद्वारे माझ्या युरोपियन भागीदारांसोबत सहकार्याची भावना अधिक दृढ करण्याचा माझा मानस आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अलीकडेच दुसऱ्यांदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. पंतप्रधान मोदी मॅक्रॉन यांना भेटून अभिनंदन करणार आहेत.
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अलीकडेच दुसऱ्यांदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. पंतप्रधान मोदी मॅक्रॉन यांना भेटून अभिनंदन करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...