आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pm Modi| Farmers Bill Cancell | After The Announcement Of Prime Minister Modi, There Was A Great Commotion On The Singhu Border, The Farmers Said, 'Let's Sit Together And Decide The Future Strategy'.

अखेर कृषी कायदे मागे:पंतप्रधान मोदीच्या घोषणेनंतर सिंघू बॉर्डरवर मोठा जल्लोष, शेतकरी म्हणाले, 'एकत्र बसून भविष्याची रणनीती ठरवू'

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीनही कृषी कायद्यांना रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होते. आज सकाळी नऊ वाजता देशाला संबोधित करत कृषी कायदे मागे घेत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही हे कायदे संपुष्टात आणणार होतो. मात्र शेतकऱ्यांना आम्हाला समजवता आले नाही. अशी खंत मोदींनी व्यक्त केली.

मोदींच्या या घोषणेनंतर दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळत आहे. सोबतच अनेक जण मोदींचे आभार आणि टीका देखील करताना पाहायला मिळत आहे. शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "अगोदर संसदेमध्ये कृषी कायदे रद्द करा त्यानंतरच आम्ही आंदोलन बंद करू." असे टीकैत म्हणाले.

अन्यायाविरुद्ध विजय- राहुल गांधी
पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी एक ट्विट करत व्हिडीओ शेअर केला आहे. 'देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मस्तक झुकवले. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन!' असे राहुल गांधी म्हणाले.

मोदींनी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची माफी मागावी
शेतकरी आंदोलनाचा हा मोठा विजय असल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. आगामी निवडणुकीत पराभवाच्या भीतीने मोदी सरकारने 3 काळे कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान मोदींनी न्यायाच्या लढाईत प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. असे ट्विट आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या त्यागाचे फळ मिळाले - नवज्योत सिद्धू
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू म्हणाले की, कृषी कायदे मागे घेणे हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. अशी प्रतिक्रिया सिद्धू यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...