आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पश्चिम बंगालमध्ये पोहोचले. ते कोलकाताच्या ब्रिगेड ग्राउंडमध्ये एका मेगा रॅलीला संबोधित करत आहेत. ते म्हणाले की, 'गेल्या दशकांमद्ये ब्रिगेड ग्राउंडमध्ये अनेक वेळा नारा देण्यात आला आहे की, ब्रिगेड चलो. या ग्राउंडने अनेक देशभक्त पाहिले आहेत. हे ग्राउंड बंगालच्या विकासामध्ये अडथळा आणणाऱ्यांचाही साक्षीदार आहे. बंगालच्या भूमीला 24 तास उपोषण आणि आंदोलनांमध्ये ठेवणाऱ्यांची धोरणे व षड्यंत्रही या ग्राउंडने पाहिले आहेत'
पुढे मोदी म्हणाले की, 'या लोकांनी बंगालच्या महान भूमीची जी अवस्था केली आहे, ती पिढ्यान पिढ्या बंगालच्या लोकांनी सहन केली आहे. ही बंगालच्या लोकांची महानता आहे, इच्छाशक्ती आहे की, त्यांनी बंगालमध्ये विकासाची आशा अजुन सोडलेली नाही. विकासासाठी ममता दीदींवर त्यांनी विश्वास ठेवला होता, मात्र दीदींनी जनतेचा विश्वासघात केला आहे, जनतेच्या स्वप्नांना मोडले आहे.'
बंगालच्या मातीने भारताचा गौरव वाढवला आहे : मोदी
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'बंगालच्या या धरतीने आपल्या स्वातंत्र्य आंदोलनात प्राण फुंकले आहेत, ऊर्जा दिली, ज्ञान-विज्ञानमध्ये भारताचा गौरव वाढवला आहे. बंगालमधून निघालेल्या महान व्यक्तींनी एक भारताची भावना सशक्त केली आहे. या धरीने एक विधान, एक निशाण, एक प्रधानसाठी बलिदान देणारे पुत्र दिले आहेत. या धरतीला मी अनेकदा नमन करतो. माझे भाग्य आहे की, आज मला या ऐतिहासिक ब्रिगेड ग्राउंडवर पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली आहे. या ग्राउंडच्या आजुबाजूला स्वामी विवेकानंदजी, सुभाष चंद्र बोस, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे जन्मस्थळ आहे.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.