आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pm Modi | India | Farmers Protest | Farmers To Write Letter To PM For MSP; Mahapanchayat Will Be Held Today

कृषी कायदे:एमएसपीसाठी शेतकरी पंतप्रधानांना पत्र लिहिणार; आज होणार महापंचायत

वृत्तसंस्था | नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेनंतरही शेतकरी आंदोलन सुरूच आहे. संसदेत कायदा रद्द होईपर्यंत आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय रविवारी सिंघू सीमेवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारी संयुक्त किसान मोर्चाची लखनऊमध्ये महापंचायतही होणार आहे. शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले की, आम्ही आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहोत.

यात एमएसपी, वीज विधेयक २०२० रद्द करणे, आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेणे आणि लखीमपूर खिरी प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना बडतर्फ करणे आदी मागण्यांचा समावेश असेल. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच असेल.

४० हून अधिक शेतकरी संघटनांच्या बैठकीत ठरवण्यात आले की, २६ नोव्हेंबर रोजी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार असल्याने सर्वच आघाड्यांवर निदर्शने केले जातील. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदे मागे घेण्याची घोषणा केली तरी एमएसपीचा मुद्दा शेतकऱ्यांनी सोडलेला नाही.

कृषी कायदे मागे घेण्यास बुधवारी कॅबिनेट देऊ शकते मान्यता
केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बुधवारी होणार आहे. या बैठकीत तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होऊ शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी हे कायदे मागे घेण्याची आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा केली होती.
शेतकरी आंदोलन : संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीतील निर्णय

बातम्या आणखी आहेत...