आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Interact With Beneficiaries Of Various Schemes Of Digital India Via Video Conferencing; News And Live Updates

डिजिटल इंडियाला 6 वर्षे पूर्ण:कोरोना काळात भारताने तयार केलेले डिजिटल सोल्यूशन्स आज संपूर्ण जगभर चर्चेचा विषय - पंतप्रधान मोदी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाच्या कोविन अ‍ॅपमध्ये अनेक देशांनी रस दाखविला

डिजिटल इंडिया योजनेला गुरुवारी 6 वर्षे पूर्ण झाले. याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. डिजिटल इंडिया म्हणजे सर्वांसाठी संधी, सर्वांसाठी सुविधा आणि सर्वांचा सहभाग. त्यासोबतच डिजिटल इंडिया म्हणजे सरकारी यंत्रणेत प्रत्येकाचा प्रवेश असल्याचे मोदी यांनी सांगितले. कोरोना काळातील भारताने तयार केलेले डिजिटल सोल्यूशन आज संपूर्ण जगात चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय असल्याचे मोदी म्हणाले.

देशाच्या कोविन अ‍ॅपमध्ये अनेक देशांनी रस दाखविला
मोदी म्हणाले की, कोरोना काळात जगातील सर्वात मोठे डिजिटल कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप्सपैकी आपल्या देशातील 'आरोग्य सेतू अॅप' हे एक होते. या अॅपमुळे कोरोना महामारीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खूप मोठी मदत मिळाली. त्यासोबतच लसीरकणासाठी असलेल्या कोविन अॅपमध्ये अनेक देशांनी रस दाखवला असून तेदेखील लसीकरण असे अॅप निर्माण करण्याच्या मार्गावर आहेत. कारण लसीकरणावर देखरेख करण्यासाठी हे अॅप खूप महत्वाची भूमिका बजावत असतात.

डिजिटल इंडियामुळे लोकांचे कार्य सोपे झाले
देशात डिजिटल इंडियामुळे अनेक लोकांचे कार्य सोपे आहे. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स, बर्थ सर्टिफिकेट, विजेचे बिल, पाणी बिल, आयकर विवरणपत्र अशा अनेक कामे घरी बसून करता येत आहे. यामुळे आपला वेळ, पैशांची बचत होत आहे. तर खेडेगावातील लोक सीएससी केंद्रावर जाऊन या गोष्टींचा लाभ घेत आहे.

डिजिटल इंडिया हा भारताचा संकल्प
डिजिटल इंडिया हे भारत देशाचे एक संकल्प असल्याचे मोदी यांनी संवाद साधताना म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, देशात आज एकीकडे नाविन्याची आवड आहे तर दुसरीकडे त्या नवीन कल्पनांना लवकर स्वीकारण्याची उत्कटतादेखील आहे. डिजिटल इंडिया ही स्वावलंबी भारताची साधना असून 21 व्या शतकातील भारताला बळकट करण्याचे घोषवाक्य असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...