आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Keynote Live News And Updates | Modi Address On The Occasion Of Virtual Vesak Global Celebrations On Buddha Purnima

बुद्ध पौर्णिमेवर मोदींचे संबोधन:कोरोनाने संपूर्ण जगाला बदलले; या कठीण परिस्थितीत बुद्धांच्या आदर्शांवर चालावे लागेल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्हाला आमच्या शास्त्रज्ञांवर गर्व आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी बुद्ध पौर्णिमेच्या औचित्यावर वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये व्हर्चुअली संबोधन केले. यावेळी त्यांनी कोरोना महामारीवर भाष्य केले. ते म्हणाले की, ज्यांनी कोरोना महामारीत आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले, त्यांच्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो. कोरोनाने संपूर्ण जगाला बदलून टाकले. आशा कठीण परिस्थितीत भगवान बुद्धांच्या आदर्शांवर चालण्याची गरज आहे.

मोदींच्या संबोधनातील 3 महत्वाचे मुद्दे

1. कोरोनामुळे जग संकटात
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. या महामारीने जगाला बदलले आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला आहे. या लढाईला सोबत मिळून जिंकावे लागेल.

2. आता महामारीशी लढण्याची समज

मोदी पुढे म्हणाले की, आता आपल्याकडे या महामारीचा सामना करण्याची समज आली आहे. आता आपल्याकडे व्हॅक्सीन उपलब्ध असल्यामुळे लढाई अजून मजबुत झाली आहे. या संकटाच्या परिस्थितीत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवत आहेत. डॉक्टर्स आणि नर्सचे योगदान कुणीच विसरू शकणार नाही.

3. आम्हाला आमच्या शास्त्रज्ञांवर गर्व आहे

महामारीमध्ये लाखो लोकांनी आपला जवळच्या व्यक्तीला गमावले. त्यांचे दुःख मी समजू शकतो. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती दुःख व्यक्त करतो. या कठीण प्रसंगी दिवस रात्र काम करणाऱ्या आमच्या शास्त्रज्ञांचा आम्हाला गर्व आहे.

IBC च्या मदतीने झाला कार्यक्रम

हे आयोजन सांस्कृतीक मंत्रालय आंतरराष्ट्रीय बौद्ध परिसंघ (IBC) च्या मदतीने आयोजित केला होता. या व्हर्चुअल कार्यक्रमात जगभरातील बौद्ध संघांचे प्रमुख सामिल झाले होते. श्रीलंका आणि नेपाळच्या पंतप्रधानांसोबतच जगभरातील 50 पेक्षा जास्त बौद्ध धर्मगुरु उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...