आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन वाढणार?:पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजता देशाला संबोधित करणार, लॉकडाऊनबाबत करू शकतात मोठी घोषणा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउन 4 वर निर्णय घेण्यापूर्वी मोदींनी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी 6 तास चर्चा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. देशातील लॉकडाऊनच्या 54 दिवसांत हे त्यांचे देशाला पाचवे संबोधन असेल. पहिल्यांदा 19 मार्च रोजी त्यांनी देशाला संबोधित केले होते. आज ते लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याबाबत बोलू शकतात. लॉकडाउन 4 वर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मोदींनी सोमवारी मुख्यमंत्र्यांसमवेत सुमारे 6 तास चर्चा केली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पहिला लॉकडाउन 25 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत आणि दुसरा लॉकडाउन 15 एप्रिल ते 3 मे पर्यंत लागू करण्यात आला होता. यानंतर लॉकडाउनचा तिसरा टप्पा 4 मे ते 17 पर्यंत आहे. 

लॉकडाउन 4.0 शक्य : निर्बंध कमी, सवलती वाढतील

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यामध्ये यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना 15 मे पर्यंत हे सांगायला सांगितले आहे की त्यांच्या राज्यात त्यांना कोणत्या प्रकारचे लॉकडाउन हवे आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसमवेत 6 तास चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र, बिहार, पंजाब, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढवण्याची विनंती केली आहे. तर बिहार, तेलंगणा आणि तमिळनाडुने रेल्वे सुरू करण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. लॉकडाउन केवळ कंटेनमेंट झोनपुरतेच मर्यादित राहिले पाहिजे, असे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणाले.

मोदी म्हणाले, आपण अर्थव्यवस्था सुरु करण्यावर काम करत आहोत. आता ग्रामीण भागात कोरोना पोहचू न देणे आपल्यासाठी मोठे आव्हान आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की आपण आपल्या राज्यातील लॉकडाउन कालावधीला कसे सामोरे जाणार याची सविस्तर योजना बनवून मला सांगा. 

बातम्या आणखी आहेत...