आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Modi Launch Ayushman Bharat Health Insurance Scheme For Jammu Kashmir Residents

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा बदल:मोदींनी पीएम जय आरोग्य योजना केली लॉन्च, प्रत्येक कुटुंबाला मिळणार पाच लाख रुपयांचे हेल्थ कव्हर

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जम्मूचे रमेश लाल या योजनेचा लाभ मिळवणारे पहिले नागरिक ठरले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमध्ये आयुष्मान भारत पीएम जय आरोग्य योजना सुरू केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा देखील उपस्थित आहेत.

या योजनेंतर्गत जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण मिळेल. कार्यक्रमात लाभार्थींना गोल्डन कार्ड देखील देण्यात आले. जम्मूच्या प्रियंका संधू यांना पहिले कार्ड मिळाले.

जम्मूचे रमेश लाल हे या योजनेचा लाभ मिळवणारे पहिले नागरिक ठरले. त्यांना कर्करोग आहे. माझ्या कुटुंबातील सर्व 5 सदस्यांकडे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड आहे असेही त्यांनी सांगितले. माझ्याकडे कार्ड नसते तर कर्करोगाचा उपचार घेणे मला अवघड झाले असते. या योजनेबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार देखील मानले.

बातम्या आणखी आहेत...